Chhatrapati Sambhajinagar Car Fall into River : छत्रपती संभाजीनगर-जळगाव मार्गावर भीषण अपघात; भरधाव कार थेट नदीत कोसळली

Chhatrapati Sambhajinagar Accident : नदीचे पात्र आणि पुलाची उंची जवळपास ३० ते ३५ फूट इतकी आहे.
Chhatrapati Sambhajinagar Accident
Chhatrapati Sambhajinagar AccidentSaam TV

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर-जळगाव मार्गावरील भीषण अपघात झाला आहे. माणिकनगर येथील पूर्णा नदीच्या पुलावरून कार नदीत पडल्याने तिघे जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

सिल्लोडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी एक कार माणिकनगर येथील पूर्णा नदीवरील पुलाच्या तुटलेल्या कठड्यातून नदीच्या पात्रात कोसळली. त्या ठिकाणी नदीचे पात्र आणि पुलाची उंची जवळपास ३० ते ३५ फूट इतकी आहे. (Latest Marathi News)

Chhatrapati Sambhajinagar Accident
Ambelohal Crime News: मुलीला त्रास का देतो..? म्हणत सासू- सासऱ्याने केलं भयंकर कृत्य; उपचारादरम्यान जावयाचा मृत्यू

शिवाजी नामदेव पांडे (४५), संदीप जनार्दन पिसाळ (३०) आणि मयूर सुनिल राऊत (२३) अशी जखमींची नावे आहेत. सर्व सिल्लोड तालुक्यातील राहणारे आहेत . या जखमींना स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. (Accident News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com