Chhatrapati Sambhajinagar: वय 32, अन् वजन 166 किलो! घाटी रुग्णालयात पार पडली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया

ही शस्त्रक्रिया करणे अवघड आणि धोकादायक होते. परंतु घाटीच्या डॉक्टरांनी हे आव्हान स्विकारून हर्नियाची शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखविण्याची किमया केली आहे.
Ghati Hospital News
Ghati Hospital NewsSaamtv

Chhatrapati Sambhajinagar News: 33 वर्षे वय आणि 166 किलो वजन असलेल्या एका महिलेच्या हर्नियाची गुंतागुंतीची यशस्वा शस्त्रक्रिया संभाजीनगरमध्ये पार पडली. शहरातील घाटी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली. हर्नियाच्या गुंतागुंत अवस्थेमुळे खासगी रुग्णालयांनी शस्त्रक्रियेसाठी नकार दिला; परंतु घाटीच्या डॉक्टरांनी हे आव्हान स्विकारून तिची हर्नियाची शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखविण्याची किमया केली आहे.

Ghati Hospital News
Gautami Patil: बेटा माझ्याशी दोन शब्द तरी बोल...; बाबांची साद गौतमी ऐकणार का?

याबाबत अधिक माहिती अशी की, परंतु, अतिलठ्ठपणा, हायपोथायरॉइडीझममुळे शस्त्रक्रिया करणे अवघड आणि धोकादायक होते. कारण अशा अवस्थेत शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर रुग्ण भुलीतून लवकर परत येत नाही. शिवाय शस्त्रक्रियेनंतर रक्ताची गाठ होणे, न्यूमोनिया, टाके तुटण्याची भीतीही होती. (Chhatrapati Sambhjinagar)

विशेष म्हणजे खाजगी रुग्णालयाने ही शस्त्रक्रिया करण्यास आधी नकार दिला होता. परंतु शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारले. इतकेच नव्हे तर या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया देखील केली.

Ghati Hospital News
Yavatmal News : ध्येय वेडा प्रवास ! अडीच फूट उंचीची मोनिका लाेखंडे ठरतेय चर्चेचा विषय

आव्हाने स्विकारून आणि जोखीम घेवून घाटीतील शल्यचिकित्साशास्त्र विभागातील अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर, डॉ. सरोजनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जुनेद शेख, डॉ. आरीफ काझी यांनी शस्त्रक्रिया केली. डॉ. रश्मी बंगाली, डॉ. ज्योती कुलकर्णी, डॉ. अश्विनी सोनटक्के यांनी ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com