Chhatrapati Sambhajinagar: खळबळजनक! वडापावमध्ये विष टाकून पत्नी- मुलाला मारण्याचा प्रयत्न; पतीसह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar News Update: पतीने पत्नी आणि पोटच्या मुलास वडापावमध्ये विष कालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime News
Chhatrapati Sambhajinagar Crime NewsSaam tv

नवनीत तापडिया, प्रतिनिधी...

Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नी आणि पोटच्या मुलाला वडापावमध्ये विष कालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून पतीने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. (Crime News In Marathi)

Chhatrapati Sambhajinagar Crime News
Samruddhi Mahamarg: सावधान! समृद्धी महामार्गावर फोटो-रील्स काढाल, तर जेलमध्ये जाल; पोलिसांनी दिले कारवाईचे संकेत

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कौटुंबिक वादातुन पतीने पत्नी आणि पोटच्या मुलास वडापावमध्ये विष कालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक (Kranti Chouk) पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. तक्रारदार महिला आणि तिच्या पतीमध्ये किरकोळ कारणावरुन गेल्या काही दिवसापासून वाद सुरू होता.

या वादातून पती शेख इसाक याने हे संतापजनक कृत्य केले. तक्रारदार महिलेचा पती शेख इसाक याने आपले नातेवाईक शेख ईब्राहीम, शेख युनूस शेख याकूब, फुरखान यांच्या मदतीने वडापावमध्ये विष कालवून पत्नी आणि मुलांना खाण्यासाठी दिले.

Chhatrapati Sambhajinagar Crime News
Onion Markets Closed: कांदा प्रश्न पेटला, आजपासून नाशिकमधील सर्व बाजारपेठेतील लिलाव बंद; व्यापारी संघटनेचा निर्णय

मात्र वडापावमध्ये वास येत असल्याने पत्नीने ते न खाता फेकून दिले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पती शेख इसाक सह पाच नातेवाईकांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com