Gangapur Crime News : पतीला जीवे मारून पत्नीवर सामूहिक अत्याचार; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक घटना

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे.
Gangapur Crime News
Gangapur Crime NewsSaam TV

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. पतीला जीवे मारून तीन नराधमांनी पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले. नराधम इतक्यावरच थांबले नाही, तर त्यांनी महिलेवर वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Gangapur Crime News
Akola Crime News : लग्नाआधीच घरी आला होता भावी जावई; मुलीची आई बाहेर जाताच केलं भयानक कांड

रायभान काशीनाथ थोरात (वय ४३ वर्षे), राहुल मच्छिंद्र आघाडे (वय ३१ वर्षे), अनिल विठ्ठल शिरसाट (वय २६ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर संतोष (वय ४०) असं मृत्युमुखी पडलेल्या पतीचं नाव आहे. ही संतापजनक घटना १ एप्रिलच्या मध्यरात्री गंगापूर तालुक्यातील एका शिवारात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत संतोष हे गंगापूर (Gangapur) तालुक्यातील एका गावात आपल्या कुटुंबासहित राहत होते. १ एप्रिल रोजी ते पत्नी आणि मुलीसह घरात झोपलेले असताना आरोपी रायभान याने मध्यरात्री त्यांच्या घराचा वाजवला. संतोष यांनी दार उघडले असता, आरोपी रायभानसह त्याच्या इतर दोन साथीदारांनी संतोष यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.

या मारहाणीत संतोष हे गंभीर जखमी झाले. आरोपी हे संतोष यांना मारहाण करत असताना त्यांची पत्नी विनवणी करत होती. ती आपल्या पतीचा जीव वाचवण्यास धडपड करत होती. दरम्यान, मारहाणीनंतर आरोपींनी जखमी अवस्थेत असलेल्या संतोष यांना शेजारील कोरड्या विहिरीत ढकलून दिले.

Gangapur Crime News
Pune Crime News: अनैतिक संबंधातून दिरानेच वहिनीसह दोन पुतण्यांना जिवंत जाळलं, पुण्यातील मन सुन्न करणारी घटना

त्यानंतर आरोपींची संतोष यांच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार (Crime News) केला. बलात्कारानंतर आरोपींनी तिच्या अंगावरचे सोन्याचे दागिनेही काढून घेतले. याबाबत कुणाकडे सांगितल्यास तुझ्या मुलीसह तुलाही जीवे मारू अशी धमकी दिली.

आरोपींने दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे पीडित महिलेने आणि तिच्या मुलींनी याबाबतची माहिती कुणालाही सांगितली नाही. त्यांनी सत्य घटना लपून ठेवली. दरम्यान, या घटनेची कुणकुण गंगापूर पोलिसांना लागली. पोलिसांनी (Police) तपासाची चक्रे फिरवत तिनही आरोपींना अटक केली. फिर्यादी व फिर्यादीच्या मुलींनी कुणालाही खरी घटना सांगीतली नाही.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध खून, पुरावा नष्ट करणे, वारंवार बलात्कार करणे, जबरी चोरी या कलमांर्तगत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. पतीला जीवे मारून पत्नीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस येताच परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com