
Waladgaon Crime News: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा पोलिस स्टेशन परिसरातील वळदगाव येथे एकाच कुटूंबातील तिघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे..
याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि पाच वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. तिघांनीही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संभाजीनगरजवळील सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वळदगाव इथली हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आज उघडकीस आली आहे.
मोहन प्रतापसिंग डांगर (वय 30), पूजा मोहन डांगर (वय 25) व श्रेया (वय 5) असे गळफास घेतलेल्या तिघांची नावे आहेत. एकाच कुटूंबातील तिघांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सातारा पोलीस वळदगाव येथे दाखल झाले असून पोलिस अधिक तपास करत आहेत. (Chhatrapati Sambhajinabar)
घटनेपूर्वी गुरुवारी कुटुंब जेवण करून रात्री झोपले, त्यानंतर रात्री हा अत्यंत हृदय मिळवटून टाकणारा प्रकार घडला. सासर माहेर एकाच गावात असलेल्या पूजाची मुलगी श्रेया ही दररोज सकाळी शेजारीच राहणाऱ्या आजीकडे जात असते.
शुक्रवारी सकाळी मात्र ती न आल्याने आजी तिला पाहण्यासाठी डांगर यांच्या त्यांच्या घराकडे गेली असता घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामे केले आहेत.
अमरावती जिल्ह्यात नव दांपत्याची आत्महत्या...
दरम्यान, अमरावतीमध्येही (Amravati News) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीच्या चिचखेडा येथील नवविवाहित जोडप्याने आत्महत्या केल्याचे समोर आली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या जोडप्याचा १० महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.