Poshan Aahar
Poshan Aahar saam tv

Poshan Aahar: गुरुजी, खिचडी कधी मिळेल हो? राज्यातील ८८ लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न; 2 महिन्यांपासून मिळेना पोषण आहार

Poshan Aahar Yojana: पोषण आहाराचा पुरवठा मागील सुमारे दोन महिन्यापासून बंद असल्याने राज्यातील अनेक शाळांमध्ये खिचडी शिजलेली नाही.

Chhatrapati Sambhajinagar News: राज्यातील जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळामधील आठवीपर्यंतचे ८८ लाखाहून अधिक विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित आहेत. शालेय पोषण आहार पुरविण्यासाठीची निविदा प्रक्रिया रखडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

पोषण आहाराचा पुरवठा मागील सुमारे दोन महिन्यापासून बंद असल्याने राज्यातील अनेक शाळांमध्ये खिचडी शिजलेली नाही. येत्या ८ ते १० दिवसात तांदूळ मिळाला नाही तर ९० शाळामधील पोषण आहार बंद होण्याची शक्यता आहे.

Poshan Aahar
Crime News: धक्कादायक! दोन तरुणांची एकाच खोलीत आत्महत्या; कोरेगावमधील खळबळजनक घटना

सध्या कुठे काय स्थिती?

सध्या काही शाळा त्यांच्याकडे शिल्लक असलेला तांदूळ आणि इतर साहित्यातून शालेय पोषण आहार शिजवून मुलांना देत आहेत. पोषण आहाराचा तांदूळ काही जिल्ह्यांत दर महिन्याला शासकीय गोदामात जमा होतो. तर काही जिल्ह्यांमध्ये त्याचा थेट शाळांना पुरवठा केला जातो.

पुरवठा करण्याचा नवीन करार झालेला नाही. जुन्या पुरवठादाराकडे करारानुसार मागणी करता येत नाही. अनेक शाळांनी पोषण आहार संपल्याचे तोंडी कळविले आहे, तर काही शाळांकडे आठवडाभर पुरेल इतका पोषण आहार शिल्लक असल्याने अशा शाळांनी अद्याप मागणी नोंदवलेली नाही. (Latest Marathi News)

Poshan Aahar
BJP News: माजी नगरसेवकाच्या खून प्रकरणी चाैघे अटकेत, भाजपचा माजी नगरसेवकच मुख्य सूत्रधार; एसपी बसवराज तेलींची माहिती

राज्यात सध्या काय स्थिती?

एकूण शाळा - ६७,५४९

एकूण विद्यार्थी - ८८,६७,३०४

मासिक किती तांदूळ येतो? - ३०,६५७ मेट्रिक टन

किती शाळांनी मागणी केली - ८,८४६

मराठवाडा

एकूण शाळा - १७,५१५

एकूण विद्यार्थी - २३,०३,१७०

मासिक किती तांदूळ येतो - ५,६१६ मेट्रिक टन

किती शाळानी मागणी केली? - ४.७२५

विदर्भ

एकूण शाळा - १२,८०७

एकूण विद्यार्थी - १२,९९,१७५

मासिक किती तांदूळ येतो? - ३,९९९ मेट्रिक टन

किती शाळांनी मागणी केली? - १,२२२

Poshan Aahar
Accident News: रॉन्ग साईडला वेगात आले, स्कॉर्पिओला धडकताच हवेत उडाले; अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO पाहाच!

कोकण

एकूण शाळा - ७,५४८

एकूण विद्यार्थी - ८,०३,५२९

मासिक किती तांदूळ येतो? - १,४९० मेट्रिक टन

किती शाळांनी मागणी केली? - उपलब्ध नाही

उत्तर महाराष्ट्र

एकूण शाळा - ११,३८३

एकूण विद्यार्थी - १८,८४, १५२

मासिक किती तांदूळ येतो? - ११,९४८ मेट्रिक टन

किती शाळांनी मागणी केली? - ११८

Poshan Aahar
Ajit Pawar : भांडणं झाली... रिव्हाॅलवर काढले... गोळीबार केला... काय मोगलाई लागून गेली आहे का ? अजित पवारांनी सरकारलं फटकारलं (पाहा व्हिडिओ)

पुरवठ्याकडे लक्ष कोण देणार?

गेल्या दोन महिन्यांपासून ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये असताना पोषण आहार देणारे सरकारी विभाग, सरकारी अधिकारी आणि सरकार हे मात्र मूग गिळून गप्प आहेत. अशा स्थितीत गरिबांच्या लेकरांना मिळणाऱ्या पोषण आहाराकडे लक्ष कोण देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com