
Case registered against Kalicharan Maharaj : आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकणी कालीचरण महाराज अडचणीत सापडले आहेत. आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) कालीचरण महाराजांसह आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे. सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे शनिवारी कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी सभेत दोन समाजात तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह भाषण केले होते.
याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्यासह आयोजक भाजपचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया, सुनील जाधव, केतन कल्याणकर यांच्यावर सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची भेट घेऊन चुकीचे गुन्हे दाखल केल्याने तातडीने जामीन देण्याची मागणी केली. (Breaking News)
अकोल्यातील हिंसाचारासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य
अकोला येथे शनिवारी रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी उसळलेल्या हिंसाचारात जमावाकडून गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. ही दंगल पूर्वनियोजित होती असं वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले होते. या प्रकरणी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Political News)
कालीचरण महाराज-खा. जलील यांची एकमेकांवर टीका
दरम्यान कालीचरण महाराज हे भगव्या कपड्यातील गुंड असून त्यांची जागा जेलमध्ये आहे अशी टीका संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. यावर बोलताना कालीचरण महाराज यांनी हत्ती चालत असताना कुत्रे हे भुंकणारच अशा शब्दात प्रत्युत्तर दिले होते. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.