
मराठा आरक्षणासाठी आंदोलक आता अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. येथे एका तरुणाने आरक्षण मिळावं म्हणून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
पाथ्रीकर या तरुणाने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचवेळी कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टाळला. कार्यकर्त्यांनी तात्काळ पाण्याचा जार त्याच्या अंगावर ओतून शांत केलं. त्यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
जरांगे यांचं उपोषण सुरूच राहणार
दरम्यान, सरकारने दिलेल्या नव्या लिफाफ्यातल्या जीआरमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सुचवलेल्या कुणबीबाबत दुरुस्त्या केल्याचं नसल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलंय. त्यामुळे आता सरसकट कुणबीबाबतच्या मुद्द्यावरून आंदोलन थांबणार नाही असं दिसताना दुसरीकडे ओबीसीही आक्रमक झालेत. (Latest Marathi News)
राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि सरकारने चार दिवसांपूर्वी दिलेल्या जीआरमध्ये तात्काळ दुरुस्त्या करून मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी असताना शासनाने नवीन जीआरमध्ये काहीच दुरूस्ती केलली नाही., असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी 12 व्या दिवशीही आपलं उपोषण सुरूच ठेवलंय.
आता सरकारने किरकोळ बदल करावा, सरकारने बदल करून जीआर दिला तर उद्या रविवारी सूर्य उगवण्यापूर्वी पाणी पिऊ, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार, असं सांगितल्यानं राज्यात आंदोलनाची धग कायम राहणार असं दिसतंय.
गेल्या 12 दिवसांपासून चर्चेचा चार-पाच फेऱ्या झाल्या. दोन वेळा मंत्री गिरीश महाजन यांनी शिष्टाई केली. पण जरांगे पाटील यांनी मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही ,अशी भूमिका घेतली. अखेर शनिवारी मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य आणि मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा होऊन काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. आज त्यातून मनोज जरांगे पाटील यांचं समाधान झालं नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.