Waluj Crime News: पोलिसांची खबरी असल्याच्या संशयावरून महिलेला मारहाण करत अत्याचार; वाळूज परिसरातील धक्कादायक घटना

या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Crime News
Crime NewsSaamTv

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhajinagar News: गुन्हेगाराची माहिती पोलिसांना देत असल्याच्या संशयावरून एका चाळीस वर्षे महिलेस मारहाण करून अत्याचार केल्याची घटना वाळूज परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला कुटुंबासह वाळूज परिसरात वास्तव्यास होती. (Latest Marathi News)

Crime News
Ahmednagar News: नटून थटून आला, मात्र बोहल्यावर चढण्याआगोदरच नवरदेव जेलमध्ये; नेमकी भानगड काय?

मात्र तिची मोठ्या मुलाला दारूचे व्यसन असल्याने तो सतत आईला शिवीगाळ करत असल्याने ती आठवडाभरापूर्वी घर सोडून शेतात राहण्यास गेली. पीडित महिला शुक्रवारी रात्री घरातच असताना त्यांच्या ओळखीचे संदीप पवार, शिवा गवळी, पोपट पवार, धनेश पवार, तेजस काळे, जिजाबाई पवार, अश्विनी पवार व गंधुका पवार हे पीडित महिलेच्या घरात शिरले यानंतर त्यांनी महिलेची वाद घालण्यास सुरुवात केली. (Crime News)

यानंतर महिलेने मी पोलिसांची (Police) खबरी नाही असे सांगत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त झालेल्या पोपट पवार व त्याच्या सहकाऱ्यांनी पीडित महिलेला खाली पाडून मारहाण करण्यास सुरुवात केली.

Crime News
Aditya Thackeray Nagpur Visit: कोराडी वीज प्रकल्प आंदोलनात आदित्य ठाकरे यांची उडी; आज नागपूर दौऱ्यावर

तसेच जर आवाज केला तर कापून टाकील अशी धमकी दिली. या मारहाणी नंतर शिवा गवळी याने पीडित महिलेची छेड काढली तर एकाने या महिलेवर पाशवी अत्याचार केला. याप्रकरणी पीडित महिलेने वाळूज पोलीस ठाणे गाठून आपबीती सांगितल्यानंतर आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com