
मावळ : राज्यसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीराजे उमेदवारी मिळवण्यासाठी राजकीय मैदानात उतरले होते. मात्र राज्यातील विविध पक्षांकडून त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी अखेर राज्यसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संभाजीराजे यांच्या समर्थकांनी राजकीय नेत्यांविरोधात जोरदार टीका केली होती. अशातच आता छत्रपती संभाजीराजे यांनी राजकीय परिस्थितीबाबत मोठं विधान केलं आहे. मी पुढाऱ्यासारखा वाहून गेलो होतो. मला समाजसेवा (Social Work) करायची होती. त्यासाठी मी अनेक राजकीय पक्षांकडे गेलो होतो. पण सर्वांकडून मला फटके बसले, असं खळबळजनक वक्तव्य छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे. संभाजीराजे लोणावळ्यात शिवक्रांती कामगार संघटनेच्या मेळाव्यात बोलत होते.
माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना आदिलशाही,निजामशाही,मोघलशाही यांनीच त्रास दिला नाही, तर महाराष्ट्रातील प्रस्थापितांनी देखील त्रास दिला. एवढ्या सहजासहजी स्वराज्य आपल्याला मिळालं नाही. मी पुढाऱ्या सारखा वाहून गेलो होतो. मला समाजसेवा करायची होती म्हणून अनेक राजकिय पक्षांकडे गेलो. पण सर्वांकडून मला फटके बसले.विस्थापितांना सोबत घेऊन सुराज्य स्थापन करणार आहे.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.