शिवप्रेमींनाे! कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे काय करायचे हे ठरवा

समाजकंटकांवर कडक कारवाई झालीच पाहिजे
uday samant
uday samant

सातारा : कर्नाटक राज्यातील बंगळूरू येथे काही दिवसांपुर्वी छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या पुतळ्यास शाही फासत काही समाजकंटकांनी विटंबना केली होती. त्याचे पडसाद कर्नाटकसह (Karnataka) आणि महाराष्ट्रात (maharashtra) उमटले. राज्यातून या प्रकाराचा आजही तीव्र निषेध नाेंदविण्यात येत आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (karnatak CM Basavaraj Bommai) यांनी ही किरकोळ घटना असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्याचा शिवप्रेमींसह राज्यातील नेते विविध माध्यमातून निषेध नाेंदवित आहेत. राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी ट्विट करुन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे काय करायचे हा निर्णय आता छत्रपती शिवाजी महाराज (shivaji maharaj) यांच्यावर प्रेम करणाऱ्या व दैवत मानणाऱ्या जनतेने करावयाचा आहे असे नमूद केले आहे.

"शिवरायांचा अपमान ही किरकोळ घटना आहे" असं वक्तव्य केल्याने शिवप्रेमी चवताळले आहेत. मंत्री उदय सामंत म्हणतात कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल झालेला निंदनीय प्रकार ही छोटी बाब आहे असे खेदजनक वक्तव्य कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आता यांचे काय करायचे हा निर्णय महाराष्ट्रातील आणि देशातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या व दैवत मानणाऱ्या जनतेने करावयाचा आहे.

uday samant
लस घेतली नसल्यास गावात पाऊल ठेवू नये; ठेवल्यास २०० रुपये दंड

छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त देशवासियांचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याप्रती सर्वांनी आदराची भावना बाळगलीच पाहिजे. कर्नाटकमधील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय असून अशा समाजकंटकांवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी भावाना देखील मंत्री सामंत यांनी व्यक्त केली हाेती.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com