Wagh Nakh News: शिवरायांची वाघनखं ब्रिटनमधून भारतात परत येणार, मुनगंटीवार यांची माहिती...

Shivaji Maharaj Wagh Nakh News: शिवरायांची वाघनखं ब्रिटनमधून भारतात परत येणार, मुनगंटीवार यांची माहिती...
Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh News
Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh NewsSaam Tv

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh News:

महाराष्ट्र सरकार आता छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ब्रिटनमधून पुन्हा भारतात आणणारा आहे. ज्या वाघनखांनी अफझल खानाचा वध केला, तीच वाघनखं परत आणली जाणार आहे. ही वाघनखं परत देण्यात ब्रिटन संग्रहालयाची मंजुरी आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार ब्रिटन संग्रहालयाशी करार करणार आहे.

महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात परत आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे लंडनला जाणार आहेत. मुनगंटीवार हे लंडनला जाऊन वाघनखं घेऊन येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh News
Maratha Reservation: आरक्षणासाठी जाती धर्मांमध्ये भांडण लावून कोणीही फायदा घेऊ नये: पंकजा मुंडे

याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत की, ''मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबा विनंती केली, तेही एमओयू करताना उपस्थित राहणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात योग्य तिथीवर वाघनखं परत आणला जाणार आहे.राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री आणो दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हे वाघनखं महाराष्ट्रात आण्याचे आहेत.'' (Latest Marathi News)

मुनगंटीवार म्हणाले की, साडेतीनशेव्या वर्षानिमित्य महाराष्ट्र सरकारकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 12 डाकतिकीट काढले जाणार आहे. दोन तिकीट काढले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित जय भवानी, जय शिवाजी जयघोष करत रायगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडला.

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh News
Sameer Wankhede News: अखेर समीर वानखेडेंना दिलासा! आर्यन खान प्रकरणात लाच घेतल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका

ते म्हणाले, महाराजांनी दुराचारी अफजल खानाचा वध केला. अशा अफजल खानाच्या कबरीचे अतिक्रम काढले. ज्या वाघनखाणी त्या अफजल खानाचा कोथळा काढला ते वाघनखं आणले जाणार आहे.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, वाघनखं आणून गावा गावात फिरवता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवू, जय भवानी जय शिवाजीचा जयघोष होईल, तलवारीची माहिती घेतली. ती छत्रपती उदयनराजे यांच्या संग्रहालयात आहे, ब्रिटिश मध्ये नेली ती जगदंबा तलवार होती. त्याकाळात माणिक मोती जडीत ती तलवार पूजेसाठी वापरली जायची. ती जगदंबा तलवार सुद्धा भारतात आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरु आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com