चिकन, अंडी महाग.....पाहा का महागली चिकन अंडी? (पहा व्हिडिओ)

मागील वर्षी बर्ड फ्लूच्या संसर्गाने चिकनच्या मागणी मध्ये चांगलीच घट पडली होती.
चिकन, अंडी महाग.....पाहा का महागली चिकन अंडी? (पहा व्हिडिओ)
चिकन, अंडी महाग.....पाहा का महागली चिकन अंडी? (पहा व्हिडिओ)Saam Tv

मागील वर्षी बर्ड फ्लूच्या Bird flu संसर्गाने चिकनच्या Chicken मागणी मध्ये चांगलीच घट पडली होती. यामुळे कुक्कुटपालन Poultry farming व्यावसायिकांना लाखो रुपयांची आर्थिक झळ बसली आहे. परंतु, यंदा कोरोना Corona काळात वैद्यकीय क्षेत्रामधील तज्ज्ञांनी चिकन आणि अंडी Eggs खाण्याचा सल्ला दिल्याने मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.

अंडी आणि चिकनच्या दरात मध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली असल्याने, नागरिकांना चिकन सुमारे २४० रुपये प्रतिकिलो, तर बॉयलर Boiler अंडी ही ८० ते ९० रुपये डझन दराने विकत घ्यावी लागत आहेत. काही दिवसांपासून कोरोनाचा कहर हा वाढला होता. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकरिता चिकन आणि अंडी सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे.

पहा व्हिडिओ-

चिकन आणि अंडी यांच्या मागणी आणि पुरवठ्यामधील प्रमाण व्यस्त झाली असल्याने, दर हे वाढले आहेत. बर्ड फ्लूच्या संकटात अनेक कुक्कुटपालन व्यावसायिकांनी पक्ष्यांचे पालन देखील केले नाहीत. यानंतर कोरोनाच्या अगोदरच्या काळात चिकन आणि अंडी यांच्या सेवनाबाबत सोशल मीडियावर गैरसमज पसरली असल्याने, कुकुटपालन व्यवसायाचे अतोनात नुकसान झालेले दिसून येत आहे.

यामुळे महाराष्ट्र Maharashtra राज्य पोल्ट्री असोसिएशनचे चिकन महोत्सवासारखे उपक्रम राबवून खवय्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. टाळेबंदीची भीती आणि कोंबड्यांच्या तुटवड्यामुळे १५ दिवसापासून चिकनच्या दरात चांगलीच वाढ झालेली दिसून आली आहे. मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्यामुळे एप्रिल- मे मध्ये चिकनच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

चिकन, अंडी महाग.....पाहा का महागली चिकन अंडी? (पहा व्हिडिओ)
मला चिकन हवं आहे... डिसचार्ज मिळालेल्या कोरोना रुग्णाचा अनोखा हट्ट

उन्हाळ्यात कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम चांगलाच जाणवला आहे. पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने, ग्रामीण भागात कुक्कुटपालन केंद्रे ही बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे सध्या बाजारामध्ये जिवंत कोंबड्यांचा तुटवडा जाणवत आहे. उन्हाळ्यात जिवंत कोंबड्यांचे वजन वाढत नसते.

या काळात पक्षी मोठ्या प्रमाणावर पाणी पित असतात. यामुळे उत्पादन खर्च वाढविला आहे. कोंबड्यांचे खाद्य महाग झाले असल्याने या मढी मोठी नहर पडली आहे. पक्ष्यांचे संगोपन करण्याचा खर्च देखील वाढला आहे. चिकनच्या दरात वाढ होत असल्याचे कुक्कुटपालन व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com