Cm Shinde On Jarange: मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार, पण...

Cm Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिष्टमंडळ जालन्यातील उपषोणस्थळी जाणार आहेत. परंतु या शिष्टमंडळात मुख्यमंत्री जाणार किंवा नाही याबाबत मात्र संभ्रम आहे.
Cm Shinde on Jarange
Cm Shinde on Jarangesaam Tv

CM Shinde Press Conference:

मागील १६ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणांसाठी उपोषण करत आहेत. सरकारच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटलांनी अटींवर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणस्थळी यावं, अशी त्यांनी अट घातली होती. (Latest News on Politics)

यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिष्टमंडळ जालन्यातील उपषोणस्थळी जात त्यांची मनधरणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या शिष्टमंडळात मुख्यमंत्री जाणार किंवा नाही याबाबत मात्र संभ्रम आहे. उपोषणस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जालन्यात येत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले होते. त्यांच्याबरोबर संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांनीही जालन्यात यावं, अशीही अट जरांगे पाटलांनी ठेवली होती.

यावर मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार की नाही यांचा खुलासा केला. मनोज जरांगे पाटलांसोबत चर्चा सुरू आहे. सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी आंतरवाली सराटी येथे जाणार आहे. काल मी मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक होती. त्यांनी सरकारची भूमिका, तांत्रिक बाबी त्यांनी समजून घेतल्या. आधी शिष्टमंडळ जाणार त्यांच्या भेटीनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे लागलीच भेटीसाठी जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

या परिषदेत त्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लीपवरूनही त्यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच खोट्या प्रचाराला मराठा समाजाने बळी पडून असंही आवाहन केलं. काही लोकांनी खोडसाळपणाने व्हिडिओ व्हायरल केला. काही विघ्नसंतोषी लोक मराठा समाजात सरकारविषयी संभ्रम तयार करत आहेत.

परंतु मराठा समाजाने कुठल्याही दुषप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केले. आज आरक्षणावर सर्वपक्षीय बैठकी घेण्यात आली. त्यात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत चर्चा झाल्याचं शिंदे म्हणालेत.

Cm Shinde on Jarange
All Party Meeting on Maratha Aarakshan: मनोज जरांगे उपोषण मागे घेणार का? सर्वपक्षीय बैठकीत एकमुखानं कोणता ठराव झाला?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com