मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आखला नवा प्लान, अख्खा महाराष्ट्रच पिंजून काढणार

मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच राज्याचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
cm Eknath Shinde
cm Eknath Shinde saam tv

रश्मी पुराणीक

मुंबई : आमचीच शिवसेना खरी असा ढिंडोरा पिटणाऱ्या एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) निष्ठा यात्रा, संवाद यात्रा घेवून ठाकरी शैलीत सणसणीत इशारा देत आहेत. शिवसेनेचे नगरसेवक, आजी-माजी आमदार, खासदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पहिल्यांदाच महाराष्ट्राचा दौरा (Maharashtra Visit) करणार आहेत. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यावर पहिल्यांदाच राज्याचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. शिंदे यांच्या नव्या रणनीतीमुळं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर मिळणार असल्याची चर्चा आहे.

cm Eknath Shinde
Mumbai: मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची बत्ती गुल! पालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाही वीजपुरवठा खंडीत

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली असून तमाम शिवसैनिकांना मार्गदर्शन करत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. औरंगाबादमध्ये पूरग्रस्त भाग, तसंच राज्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचंही समजते आहे.

cm Eknath Shinde
एकनाथ शिंदेंच्या झेड सुरक्षेवर शरद पवारांची प्रतिक्रिया

जनतेला मुख्यमंत्री आपलेच आहेत, असे वाटले पाहिजे म्हणून दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान, मुख्यमंत्री चार दिवस मंत्रालयात आणि तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. आज संध्याकाळपर्यंत दौऱ्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेही महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिंदे विरुद्ध ठाकरे असा जोरदार सामना रंगणार असल्याची चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गेल्या काही दिवसांपासून अॅक्टिव्ह मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. बंडाचं निशाण फडकावून गुवाहाटीत तळ ठोकणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारला (mva government) पायउतार केले. 'आवाज कुणाचा' अशी डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेलाही जोरदार धक्का दिला.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com