कोण मुख्यमंत्री?... आधी टोलचे पैसे द्या; टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याची वारकऱ्यांशी हुज्जत

टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून टोल वसुली करण्यात आली.
Eknath Shinde
Eknath Shinde saam tv

अकोला : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. मात्र टोलमाफी कागदावरच असल्याचा अनुभव अकोल्यातील वारकऱ्यांना आला आहे. अकोल्यातील काही वारकरी पंढरपूरला जात असताना बीड-उस्मानाबाद रोडवरील पारगावच्या आयआरबी कंपनीच्या टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून टोल वसुली करण्यात आली. (Ashadhi Ekadashi Latest News)

Eknath Shinde
आदित्य ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; थेट एकनाथ शिंदेच्या बालेकिल्यात शक्तीप्रदर्शन करणार

वारकऱ्यांनी टोल मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. त्यामुळे वारकऱ्यांना देण्यात आलेली टोलमाफी कागदावरच आहे का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असताना वारकऱ्यांकडून टोल मागणी करत असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, पैसे मागणी करत असताना हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओत टोल नाक्यावरील कर्मचारी कोण मुख्यमंत्री?... आधी टोलचे पैसे द्या, आम्हाला टोल माफीचा जीआर मिळाला नसल्याचे सांगत आहेत. यामुळे वारकऱ्यांना देण्यात आलेली टोलमाफी कागदावरच आहे का असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. (Eknath Shinde Latest News)

Eknath Shinde
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणखी अडचणीत, CBIकडून गुन्हे दाखल

वारकऱ्यांसाठी टोलमाफीची केली होती घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी आषाढी एकादशीच्या अनुषंगाने वारकऱ्यांच्या सोयीसुविधेसाठी आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुख्य सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com