Ekntah Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

असा असणार एकनाथ शिंदे यांचा दौरा...
Eknath Shinde
Eknath Shindesaam tv

औरंगाबाद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आज दुपारी १२.३० वाजताऔरंगाबादमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर ते पैठणमध्ये होणाऱ्या सभेसाठी रवाना होणार आहेत. एकनाथ शिंदे हे दुसऱ्यांदा औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री यांच्या आजच्या औरंगाबाद दौऱ्यासाठी शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आजच्या हा दौरा मराठवाड्याच्या (Marathwada) दृटीने महत्वाचा आहे. तसेच या दौऱ्यातून मराठवाड्यासह औरंगाबादकरांना काय मिळणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान ज्या बिडकीन गावात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढली होती, त्याच बिडकीन गावात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा रॅली निघणार आहे. गेल्या काही दिवसातील शिवसेना आणि शिंदे गटातील तणावाचे वातावरण पाहता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. औरंगाबाद ते पैठण आणि पैठण ते पाचोड असा रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे. खुद्द पोलीस अधीक्षक सुरक्षेचा आढावा घेत आहे.

Eknath Shinde
Asia Cup 2022|आशिया चषक चॅम्पियनला मिळाले इतके कोटी, वाचा कोणाला किती बक्षीस मिळाले

असा असणार एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण औरंगाबाद दौरा..

दुपारी 12.30 वाजता औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळ येथे आगमन व मोटारीने पैठणकडे प्रयाण.

- दुपारी 1.40 वाजता संत एकनाथ महाराज मंदिरास भेट व नाथ महाराजांचे दर्शन. (स्थळ: पैठण, जि.औरंगाबाद)

- दुपारी 1.55 वाजता छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण.

- दुपारी 2 वाजता नागरी सत्कार आणि जाहीर सभेस उपस्थिती. (स्थळ: कावसानकर स्टेडियम, पैठण)

- दुपारी 3.30 वाजता पैठण येथून मोटारीने आपेगाव ता. पैठणकडे प्रयाण.

- दुपारी 3.45 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरास भेट व दर्शन (स्थळ: आपेगाव, ता.पैठण).

- सायं 4.45 वाजता संदिपान भुमरे, मंत्री, रोहयो व फलोत्पादन यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव (स्थळ : पाचोड ता.पैठण)

- सायंकाळी 6 वाजता चिकलठाणा विमानतळ औरंगाबाद येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com