राज्यात डबल इंजिन सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्कम पाठिंबा, CM एकनाथ शिंदे म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेबाबत मोठं विधान केलं.
Narendra Modi and Eknath Shinde
Narendra Modi and Eknath ShindeSaam TV

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा ६० वा वर्धापनदिन सोहळा (MIDC) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेबाबत मोठं विधान केलं. शिंदे-फडणवीस सरकार राज्याचा विकास घडवणार आहे.राज्यासाठी समृद्धी महामार्ग गेम चेंजर प्रकल्प आहे. राज्यात डबल इंजिन सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राज्य सरकारच्या पाठीशी आहेत. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन एवढी बनवण्यासाठी वाटचाल सुरु आहे, असं प्रतिपादन शिंदे यांनी एमआयडीसीच्या कार्यक्रमात केलं आहे.

Narendra Modi and Eknath Shinde
सर्वात मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी

एमआयडीसीच्या वर्धापनदिन सोहळ्यात शिंदे म्हणाले, मला आणि देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भक्कम पाठबळ दिलंय.फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक उद्योग राज्यात आले. गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे केला. एका रस्त्याचं महत्व किती हे यावरून लोकांना कळालं.समृध्दी महामार्ग हे देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न आहे. राज्यासाठी समृद्धी महामार्ग गेम चेंजर प्रकल्प आहे.

Narendra Modi and Eknath Shinde
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार - एकनाथ शिंदे

समृध्दी महामार्गाचे लवकरच लोकार्पण होईल. समृध्दी महामार्गाच्या परिसरात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना सवलत देऊ. ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याकडे राज्याची वाटचाल सुरु आहे. मुंबई ट्रान्स हार्बरलिंकचाही मोठा फायदा होईल. रखडलेली कामं पुन्हा वेगानं सुरु होतील. अडीच वर्षांपूर्वी झालेली चूक आता आम्ही सुधारलीय. एमआयडीसीची सुरुवात वागळे इस्टेटमधून झाली. वागळे इस्टेटमधूनच माझ्या राजकारणाला सुरुवात झालीय, असंही शिंदे यावेळी म्हणाले.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com