Gulabrao Patil : एकनाथ शिंदेच ज्योतिषाचं भविष्य सांगतील; गुलाबराव पाटील काय म्हणाले, वाचा...

कार्यकर्त्यांनी सांगितलं म्हणून मुख्यमंत्री तिकडे गेले असतील, असं म्हणत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली आहे.
Gulabrao Patil, CM Shinde
Gulabrao Patil, CM Shinde Saam TV

Gulabrao Patil News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्तुत्वान असून त्यांना स्वतःचे भविष्य पाहण्याची गरज नाही, उलट ते भविष्यकाराचे भविष्य पाहतील, राजकारणात नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भावनांच्या आदर करावा लागतो, कार्यकर्त्यांनी सांगितलं म्हणून मुख्यमंत्री तिकडे गेले असतील, असं म्हणत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली आहे. ते नंदुरबारमध्ये बोलत होते. (Latest Marathi News)

Gulabrao Patil, CM Shinde
महाराष्ट्र असा तसा वाटतो का? अजित पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; सरकारलाही सुनावलं

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बुधवारी शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अचानक आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केला. मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर एकनाथ शिंदेंनी ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा अनिसने जाहीर निषेध केला असून विरोधकांनीही त्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

गुलाबराव पाटलांनी केली पाठराखण

या प्रकरणावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे. एकनाथ शिंदे हे स्वतःचं भविष्य तयार करणारा माणूस आहे, भविष्य पाहण्याची गरज नाही. ते भविष्यकाराचे भविष्य सांगतील. कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून मुख्यमंत्री तिकडे गेले असतील. एकनाथ शिंदे हे स्वतःचं भविष्य तयार करणारा माणूस आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे ते कोणालाही भविष्य दाखवणार नाही, असा दावा पाटील यांनी केला.

Gulabrao Patil, CM Shinde
Crime News : ४ महिलांकडून तरुणावर सामूहिक अत्याचार; जालंधरमधील धक्कादायक घटना

इतकंच नाही तर, मुख्यमंत्री स्वतःचं भविष्य बघणार नाही, तर तेच भविष्यकाराचं भविष्य सांगतील. असा आमचा नेता आहे, असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे. नेत्याला कोणी कार्यकर्त्यांनी सांगितले तर नेता तिथे जात असतो. त्यामुळे ते गेलेही असतील, अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याच्या चर्चेवर अजितदादांची प्रतिक्रिया

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्य पाहिल्याच्या चर्चेवर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. 'आपण का अंधश्रद्धेला खतपाणी घालतो मला समजत नाही. प्रत्येकाची कुठे ना कुठे निष्ठा असते, विश्वास असतो त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याच्या बातम्या आल्या आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे माहिती नाही. त्यामुळे वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केली पाहिजे', असं अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, 'ही आपली परंपरा आहे. त्याबद्दल आपल्या मनात आदराचं, श्रद्धेचं स्थान आहे. तिथंपर्यंत मी समजू शकतो. मात्र, ज्योतिषाकडे जाऊन आपलं भविष्य बघणं म्हणजे २१ व्या शतकात सर्व जग चाललं असताना आपण अंधश्रद्धांना खतपाणी घालण्यासारखं आहे.'

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com