'...तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं मराठा समाजाला आश्वासन

राज्यात साडेसात हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करणार - मुख्यमंत्री
Eknath Shinde
Eknath ShindeSaam TV

औरंगाबाद: मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपलं सरकार स्वस्थ बसणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला दिलं. मुख्यमंत्री सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते काल औरंगाबाद शहरात असताना शहरातील टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, 'औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठा (Maratha) समाजाला आश्वासन दिलं की या मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय आपलं सरकार स्वस्थ बसणार नाही. शिवाय राज्यात साडेसात हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या नूतनीकरणासाठी शिंदे यांची पाच कोटी रुपयांची घोषणा मुख्यमंत्र्यानी केली.

पाहा व्हिडीओ -

यावेळी बोलताना ते म्हणाले, 'कालपासून जनतेचा पाठिंबा मिळतोय आम्ही घेतलेली भूमिका तुम्हाला पटलेली आहे ना? असा प्रश्न विचारताचं लोकांनी हो म्हणत मुख्यमंत्र्यांना सहमती दर्शवली. ते पुढे म्हणाले, बाळासाहेबांचे, धर्मवीरांचे विचार पुढं घेऊन निघालो आहे.

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि अटल बिहारी वाजपेयीजी, प्रमोद महाजन यांनी जी युती केली होती, ती पुढे घेऊन चाललो आहे. हे सरकार सर्वसामान्याचं आहे. समाजातल्या प्रत्येक घटकांचं आहे. पोलीस भरतो लवकर होणार, पहिल्या टप्प्यात साडे सात हजार आणि पुढच्या टप्प्यात अधिक होईल. तरुणांना रोजगार देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला, ते आपापल्या कर्माने जातील अशी नाव न घेता टीका त्यांनी संजय राऊतांवर केली.

Eknath Shinde
"कोण चोर अन् कोण लुटारू हे सातारकरांनी चांगलंच ओळखलंय"; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना खोचक टोला

तसंच मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपलं सरकार स्वस्थ बसणार नाही. महिला भगिनींना न्याय देण्याचा काम आपलं सरकार करेल. पूर परिस्थितीमध्ये जे नुकसान झालंय, त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. औरंगाबादच्या विकासामध्ये कुठी कमी पडू देणार नाही असंही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com