Ashadhi Ekadashi 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे

यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्मंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
Ashadhi Ekadashi 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे
Ashadhi Ekadashi 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडेFacebook/ CMOMaharashtra

पंढरपूर - पंढरपुरात Pandharpur पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी होऊ दे. यासाठी विठुराया आता कोरोनाचे Corona संकट नष्ट होऊ दे. माझ्या या महाराष्ट्राला Maharashtra आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी आज पांडुरंगाच्या चरणी घातले आहे. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्मंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

हे देखील पहा -

आषाढी एकादशी निमित्त उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. वारकऱ्यांनी तुडुंब,आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेले पंढरपूर पहावयाचे आहे. आज मी मंदिरात वृक्षारोपण केले. हा परंपरेचा एक वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Ashadhi Ekadashi 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे
Ashadhi Wari 2021 विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नयनरम्य फुलांची आरास

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्यावतीने मानाचे वारकरी या नात्याने देण्यात येणाऱ्या एक वर्षाचा मोफत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. पंढरपूर नगरपरिषदेस राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या यात्रा अनुदानाच्या पाच कोटी रुपये रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.महापूजेनंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मंदिर समितीने या छायाचित्राचे पुस्तक स्वरुपात जतन करुन हा वारसा जगापुढे ठेवावा.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com