महाड येथील बचाव कार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अडकलेल्यांची सुटका करणे सुरु पूरग्रस्तांनी घराच्या छतावर, उंचावर थांबल्यास लगेच मदत करणे शक्य.
महाड येथील बचाव कार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
महाड येथील बचाव कार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावाSaam Tv

महाड येथील बचाव कार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अडकलेल्यांची सुटका करणे सुरु पूरग्रस्तांनी घराच्या छतावर, उंचावर थांबल्यास लगेच मदत करणे शक्य, स्वयंसेवी संस्थांना अन्नाची पाकिटे, कपडे याविषयी आवाहनसंपुर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने कहर केला आहे अशातच नेहमीच पावसाने हैराण असणाऱ्या महाड वासीयांना या वेळी पण पूरपरिस्थितीला सामोर जावं लागलं आहे. Chief Minister Uddhav Thackeray took information about the flood situation in Mahad

याच महापूराच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड येथीस पूरपरिस्थिचा आढावा रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून घेतला आहे. महाड येथील पूरग्रस्तांच्या बचावकार्यासाठी बचाव पथके हेलिकॉप्टरच्या सहाय्याने महाड मधील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी सज्ज असल्याचही सांगितलं आहे. तसेच जे जे लोक अडकले आहेत त्यांना घरांच्या छतावर तसेच उंचावर थांबल्यास हेलिकॉप्टरद्वारे मदत करणाऱ्या बचाव पथकाला ते दिसतील आणि मदत करण सोप्पं जाईल त्यामुळे त्यांनी उंचावरती थांबाव असे प्रशासनाने लोकांना आवाहन केलं आहे. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

बचावकार्य, रस्त्यावरील अडथळे दूर करण्याचे काम लगेच सुरु करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पाणी ओसरलं असलं तरीही महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल व रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे असेही मुख्यमंत्री सांगितले आहे.

माणगाव पाचाड मार्गे महाड रस्ता, माणगाव महाड महामार्ग, गोरेगाव दापोली रस्ता आता सुरु झाला असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी चौधरीनी दिली आहे.

स्वयंसेवी संस्थांना आवाहन

माणगाव येथे सुमारे २००० अन्नाची पाकीट तयार आहेत. सकाळी 10 वाजेपर्यंत अजून २००० अन्नाची पाकिटे तयार होतील .याबाबत तहसीलदार माणगाव ही पाकिटे गरजू लोकांना वितरणाचे नियोजन करीत आहेत. माणगाव तहसील कार्यालयातून महाडसाठी ST बसने खाण्यापिण्याचे साहित्य पाठविेले आहे. स्वयंसेवी संस्थांनी देखील यासंदर्भात महाड येथे प्रशासनाच्या संपर्कात रहावे व कपडे, अन्न याची मदत पोहचवावी असे आवाहन केल्याचेही जिल्हाधिकारी चौधरींनी सांगितलं.

आरोग्य यंत्रणा सज्ज

महाड मधील परिस्थितीत कोविड तसेच इतर रुग्णांना असुविधा होऊ नये याची काळजी घेण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. बाटू लोणेरे येथे एक वैद्यकीय पथक यासाठी तयार आहे.

Edited By -Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com