बुलढाणा: चिखलीत इलेक्ट्रॉनिक दुकानात सशस्त्र दरोडा; दुकान मालकाचा खून

दरोडेखोर सीसीटीव्ही मध्ये कैद..
बुलढाणा: चिखलीत इलेक्ट्रॉनिक दुकानात सशस्त्र दरोडा; दुकान मालकाचा खून
बुलढाणा: चिखलीत इलेक्ट्रॉनिक दुकानात सशस्त्र दरोडा; दुकान मालकाचा खूनसंजय जाधव

संजय जाधव

बुलढाणा : बुलडाणा Buldhana जिल्ह्यातील चिखली Chikhali शहराच्या जयस्तंभ चौकातील 'आनंद इलेक्ट्रॉनिक' या दुकानात रात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा Robbery पडला असून दोन दरोडेखोरांच्या हल्ल्यात दुकान मालक कमलेश पोपट (वय 55 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण चिखली शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस Chikhali Police दाखल झाली आहे. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही CCTV मध्ये कैद झाली आहे.

काय घडलं ?

आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट यांनी रात्री 10 वाजताच्या सुमारास आपल्या दुकानाचा मुख्य शटर बंद केले व बाजूचा लहान शटर उघड असताना एका दुचाकीवर तीन दरोडेखोर आले. त्यातील दोन जण आत ग्राहक बनून दुकानात घुसले व त्यांनी कमलेश पोपट यांच्यावर धारदार शस्राने हल्ला करुन रोख रक्कम लुटली व त्यांच्यावर धारदार शस्त्राने Sharp Weapons वार केले त्यात कमलेश पोपट गंभीर जखमी झाले.

बुलढाणा: चिखलीत इलेक्ट्रॉनिक दुकानात सशस्त्र दरोडा; दुकान मालकाचा खून
बीड: 'त्या' बालविवाहितेवर बलात्कार प्रकरणी निलंबित मुख्याध्यापकसह एका महिलेला पोलिसांनी घेतलं ताब्यात

त्यांना खाजगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपास सुरू केला आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com