Child Marriage : अल्पवयीन मुलीशी लग्न? पाेलिस दलात खळबळ; छळाप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

सासरच्या मंडळीने मुलीला एक महिना चांगले नांदवले.
beed , police, child marriage
beed , police, child marriagesaam tv

BEED News : राज्यात बालविवाह रोखण्यासाठी विविध उपक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. त्याचबरोबर बालविवाहासंदर्भात कडक कायदे देखील केले जात आहे. मात्र याच कायद्याची अन जनजागृतीची पायमल्ली कायद्याचे रक्षक असणाऱ्या पोलिसाने (Police) होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.

beed , police, child marriage
Raj Thackeray Parli News : राजप्रेमींचा भाजप, एनसीपीच्या बालेकिल्ल्यात धुडगूस; उत्साहाच्या भरात...

बीडच्या (beed) गेवराई पोलीस ठाण्यात पीडित विवाहितेने पोलीस पतीकडून छळ केला जात असल्याची फिर्याद दिली होती. मात्र पीडिता ही अल्पवयीन असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणात पतीसह सासऱ्याच्या मंडळींवर छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र आता पीडिता ही अल्पवयीन असल्यामुळे बालविवाह कायद्यासह पाेक्साेचा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra News)

beed , police, child marriage
Latur Talathi News : ३५ लाखांची संपत्ती आली काेठून? ACB चौकशीत तलाठ्याला उत्तर देता येईना

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीवरून, 17 वर्षीय पीडितेने पोलिसात फिर्याद दिलीय. या फिर्यादीत म्हटले आहे, की पीडितेचा पती हा बीड पोलीस दलात आहे. 18 मे 2022 रोजी तिचा रितीरिवाजाप्रमाणे विवाह लावून दिला. त्यानंतर सासरच्या मंडळीने एक महिना चांगले नांदवले. त्यानंतर पती, सासरा, सासू, जाऊ, दीर, नणंद, नणंदेचा नवरा यांनी प्लॉट घेण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये घेवून ये म्हणत त्रास देण्यास सुरुवात केली.

beed , police, child marriage
Kokan News : शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचा मास्टर प्लॅन; राष्ट्रवादीचा माजी आमदार परतणार स्वगृही ?

त्यावर आई-वडील गरीब असल्याचे सांगितल्यावर इथे रहायचे असेल तर पैसे आणावेच लागतील, असे म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली. हा त्रास वाढतच राहिल्याने ही बाब पीडितेने वडिलांना सांगितली व त्यानंतर वडील माहेरी घेवून गेले. त्यानंतर मुलीला नांदायला पाठवायचे असेल तर फ्लॉटसाठी 15 लाख रुपये द्या, नाही तर मुलीला पाठवू नका असा निरोप सासरच्या मंडळींनी दिला. त्यानंतर माहेरी येवून पैसे द्यावेच लागतील असे म्हणून पतीने (husband) शिवीगाळ करत मारहाणही केली.

beed , police, child marriage
Maharashtra News : चर्चा तर हाेणारच !कर्नाटकात जाताच महाराष्ट्रातील नेत्याचे घटलं वजन

यादिलेल्या फिर्यादीवरुन गेवराई पोलीस ठाण्यात (ता. 2) जानेवारीला पतीसह सासरच्या 8 जणांवर (कलम 498, 323, 504, 506, 34 नुसार) गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणात आता अधिकचा तपास केला जाणार आहे

विवाहितेचे पालक अडचणीत ?

यामुळे सासरच्या मंडळीसह माहेरच्या मंडळींवर बालविवाह लावल्या प्रकरणात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर आली त्याचबरोबर पोलीस पतीवर देखील बालविवाह आणि दाखल होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान कायद्याच्या रक्षकाडूनकडूनच असा प्रकार घडल्याने बालविवाह रोखणार कसे ? असाचं प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com