बालविवाह; 21 वर्षांचा नवरदेव अन् 9 वर्षांची नवरी, मोहोळमध्ये चौघांवर गुन्हा दाखल

बालविवाह लावल्याची धक्कादायक घटना मोहोळ तालुक्यातील पेनूर या गावी घडली
बालविवाह; 21 वर्षांचा नवरदेव अन् 9 वर्षांची नवरी, मोहोळमध्ये चौघांवर गुन्हा दाखल
बालविवाह; 21 वर्षांचा नवरदेव अन् 9 वर्षांची नवरी, मोहोळमध्ये चौघांवर गुन्हा दाखलSaam Tv

सोलापूर : २१ वर्षांच्या वरासोबत ९ वर्षांच्या बालिकेचा विवाह लावल्याची धक्कादायक घटना मोहोळ (Mohol) तालुक्यातील पेनूर (Penur) या गावी घडली आहे. याप्रकरणी नवरदेवासह त्याचे आई- वडील आणि मुलीच्या आईवर मोहोळ पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी आणि तिची आई बेपत्ता असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

हे देखील पहा-

नवरदेव अविनाश दाजी शेळके (वय- २१), दाजी भीमराव शेळके, तारामती दाजी शेळके यांच्यासह पीडित मुलीच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहोळ तालुक्यातील पेनूर या गावात ३० नोव्हेंबर दिवशी एका ९ वर्षांच्या मुलीबरोबर कोन्हेरी येथील नात्यातीलच (relationship) अविनाश शेळके याचा विवाह लावून देण्यात आला होता. दरम्यान, हे नवविवाहित जोडपे देवदर्शनाकरिता गेले होते. त्या ठिकाणचे काही फोटो नवरदेवाने त्याच्या मोबाईलवर (Mobile) स्टेटस ठेवले होते.

बालविवाह; 21 वर्षांचा नवरदेव अन् 9 वर्षांची नवरी, मोहोळमध्ये चौघांवर गुन्हा दाखल
'नाचता येईना अंगण वाकडं' निवडणुकांच्या निकालावरुन चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसला टोला

'नाचता येईना अंगण वाकडं' निवडणुकांच्या निकालावरुन चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसला टोलात्या फोटोंचा (photos) स्क्रीनशॉट काढत अज्ञाताने सोलापूर (Solapur) येथील महिला व बालविकास कार्यालयातील ‘चाइल्डलाइन’च्या (Childline's) क्रमांकावर फोन करत या बालविवाहाची माहिती दिली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, सदस्य योगेश स्वामी, दत्तात्रेय शिर्के यांच्या पथकाने मोहोळ पोलिसांची मदत घेऊन कोन्हेरी गावी जाऊन चौकशी केली. यात अविनाश याने त्याच्या नातेवाईकांच्या ९ वर्षांच्या मुलीसोबत विवाह केल्याचे लक्षात आल्यानंतर दाजी शेळके, तारामती शेळके, नवरदेव अविनाश शेळके व मुलीच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com