मिरज तालुक्यात दोन ठिकाणी बाल विवाह; नातेवाईकांवर गुन्हा दाखल

बेडग येथील साडे सतरा वर्षाच्या मुलीचा बीड मधील मुलासोबत विवाह सुरू असल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाली.
मिरज तालुक्यात दोन ठिकाणी बाल विवाह; नातेवाईकांवर गुन्हा दाखल
मिरज तालुक्यात दोन ठिकाणी बाल विवाह; नातेवाईकांवर गुन्हा दाखलविजय पाटील

सांगली जिल्ह्यातील (Sangali District) तीन ठिकाणी बालविवाहच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामधील दोन बालविवाह (Child Marriage) हे मिरज तालुक्यातील आहेत. बेडग येथील साडे सतरा वर्षाच्या मुलीचा बीड मधील मुलासोबत विवाह सुरू असल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी बेडग येथे जाऊन नवरा नवरी आणि व्हराडाला पोलीस ठाण्यात आणले. मुलीला संज्ञान होण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी कमी असल्याने ग्रामीण पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार नवरा मुलगा राहुल प्रकाश आंधळे, वडील प्रकाश रामू आंधळे आशाताई आंधळे आणि मुलीची आई सारिका सानप, मुलीचा सासरा विठोबा सानप यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. https://www.youtube.com/watch?v=bgyfmrmaRBo

मिरज तालुक्यात दोन ठिकाणी बाल विवाह; नातेवाईकांवर गुन्हा दाखल
कला दिग्दर्शक राजू सापतेंच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

त्याच बरोबर कर्नाटक हिजर्गी येथील 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा सुभाष नगर येथील सचिन माळी तरुणाशी लग्न झाल्याचा प्रकार घडला आहे. दिनांक 13 रोजी कर्नाटक हिजर्गी येथे हे लग्न झाले होते. आज सुभाष नगर येथे घरात असल्यांनतर या लग्नाची माहिती मिरज शहर पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी सुभाष नगर येथे जाऊन नवरा मुलगा त्याची आई नवरीची मावशी यांना पोलीस ठाण्यात आणले होते. कर्नाटकात हा बालविवाह झाला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

बाल संरक्षण अधिकारी सांगली बाबासाहेब नागरगोजे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जिल्ह्यात असे बालविवाह पालकांनी करू नये. तसेच होत असतील तर आमच्याशी संपर्क साधावा.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com