Nashik Bus Accident: नाशिकमध्ये चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण अपघात; 11 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू, मृतांमध्ये एका बाळाचा समावेश

Nashik Bus Accident: नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल जवळ ही घटना दुर्देवी घटना घडली आहे.
Nashik Bus Accident
Nashik Bus Accidentअभिजीत सोनावणे

नाशिक: नाशिकमधून एक अतिशय दुर्देवी बातमी आली आहे. नाशिकमध्ये (Nashik) पहाटे सव्वापाच वाजचा एका लक्झरी बसचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात बसला भयंकर आग लागली आणि यात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस होती. यवतमाळच्या पुसदकडून मुंबईकडे ही बस जात होती. (Nashik Accident News)

Nashik Bus Accident
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना 'या' तारखेपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार

मिळालेल्या माहीतीनुसार, नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल जवळ ही घटना दुर्देवी घटना घडली आहे. एका आयशर ट्रक आणि बसमध्ये हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, बसने पेट घेतला आणि ही लक्झरी बस जाळून खाक. या अपघातात 12 प्रवासी मृत्यूमुखी पडले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ही लक्झरी बस दुमजली होती. अपघात झाला तेव्हा बसमधील डिझेलच्या टाकीने पेट घेतला. आग लागल्याने प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पण आग वाढल्याने जे प्रवाशी बसच्यया वरच्या मजल्यावर होते त्यांना बाहेर पडता आले नाही. या अपघातात अनेक जण जिवंत जळाले आहेत, त्यांचा आता फक्त सांगाडा उरला आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी अशीही माहिती दिली की, मृतदेह नेण्यासाठीही रुग्णवाहिका नव्हत्या, त्यामुळे सिटी बसमधून या अपघातामध्ये जिवंत जळालेल्यांचे मृतदेह नेण्याची वेळ ओढावली. बसमध्ये किमान 50 प्रवासी होते. त्यातील 25 प्रवाशांना आम्ही जळताना पाहिलं, असंही काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय. अग्निशमन दल हाकेच्या अंतरावर असूनही वेळेत मदत पोहोचू शकली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर

या घटनेची माहीती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमींवर तात्काळ उपचार देण्याचे आदेश दिले आहेत, तसेच मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली आहे. सोबतच या भीषण अपघाताच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com