Chipi Airport: शेवटी पायगुण लागतो आणि मुख्यमंत्र्यांच्या रुपाने हा पायगुण लाभला - सुभाष देसाई

विनायक राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
Chipi Airport: शेवटी पायगुण लागतो आणि मुख्यमंत्र्यांच्या रुपाने हा पायगुण लाभला - सुभाष देसाई
Chipi Airport: शेवटी पायगुण लागतो आणि मुख्यमंत्र्यांच्या रुपाने हा पायगुण लाभला - सुभाष देसाईSaam Tv

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. आज दिवस हा कोकणवासियांसाठी खूप मोठा दिवस आहे. कारण सिंधुदुर्गच्या चिपी परुळे येथील विमानतळाचा आज शुभारंभ होत आहे. आज यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नारायण राणे याचे उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर अटकसत्र या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम आणि त्यांचे एका मंचावर येणे याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. दरम्यान, यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित झाले होते.

हे देखील पहा -

यावेळी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राचे लाडके आणि देशातील एक नंबरचे मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. अनेकांनी या विमानतळाच्या उद्घाटनाला उशीर झाल्याची प्रतिक्रिया दिली. पण शेवटी पायगुण लागतो. मुख्यमंत्री यांच्या रुपाने हा पायगुण लाभला आहे असे देखील सुभाष देसाई म्हणाले. त्याचबरोबर विनायक राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विमानतळासाठी लागण्याचा प्रत्येक गोष्टीचा ते पाठपुरावा  करत होते असे देसाई यांनी यावेळी सांगितले.

Chipi Airport: शेवटी पायगुण लागतो आणि मुख्यमंत्र्यांच्या रुपाने हा पायगुण लाभला - सुभाष देसाई
Ajit Pawar : सलग तिसऱ्या दिवशी तपासणी सुरु, पवारांचे निकटवर्तीय आयटीच्या रडारवर

कोकणाच्या, आपल्या दृष्टीनं हा आनंदाचा सण आपण साजरा करत आहोत. आता कोकणवासियांची सर्व स्वप्न साकार होतील, असंही देसाई यावेळी म्हणाले."आज सिंधुदुर्गात चिपी विमानतळाच उद्घाटन हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. इथून पुढे चिपी विमानतळावरील सर्व विमान उड्डाण फुल असावीत अशी सदिच्छा व्यक्त करतो. १९९२ मध्ये तेव्हाचे मंत्री माधवराव सिंधिया यांनी विमानतळासाठी सिंधुदुर्गाची हवाई पाहणी केली होती. आज २७-२८ वर्षांनी हा योग जुळून आला आहे" असे देसाई यावेळी म्हणले.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com