Chipi Airport: मी बाळासाहेबांचा सैनिक म्हणत राणेंची सेनेवर तोफ

उद्धव जी ...हे साहेबांच्या प्रेरणातून आत्मसात केले आणि मी अंमलबजावणी केली.
Chipi Airport: मी बाळासाहेबांचा सैनिक म्हणत राणेंची सेनेवर तोफ
Chipi Airport: मी बाळासाहेबांचा सैनिक म्हणत राणेंची सेनेवर तोफSaam Tv

वैदेही काणेकर

नारायण राणे : आज ९ ऑक्टोबर या दिवशी चिपी विमानतळाचे उदघाटन. सिंधुदुर्गासाठी अत्यावश्यक असणाऱ्या विमानतळाच्या उद्घटनासाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानतो. अश्या क्षणी राजकारण करू वाटत नाही, विमान डोळेभरून पाहावं या हेतूने आलो. तसाच मंचावर आलो. त्यापूर्वी मुख्यमंत्री कानात बोलले. देशाचे पर्यटक सिंधुदुर्ग मध्ये यावे. ४-५ लाख खर्च करावे. आर्थिक समृद्धी यावी अशी माझी ईच्छा होती.

मी 1990 मध्ये या जिल्ह्यात आलो. मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला या जिल्ह्यामध्ये पाठवले. त्यावेळेस रस्ते नव्हते, मेडिकल वैगरे तर सोडाच, मुंबईत 90 साली आलो. मग मी ठरवलं इथला विकास करायचा. मी हे सर्व सांगतोय फक्त पण लोक ठरवतील हे कोण केलं. मी जिल्हा फिरलो करण बाळासाहेबांनी मला पाठवलं फेब्रुवारी महिन्यानंतर पाणी नसायचं, रस्ते नव्हते, हायवे दुर्दशा, वीज नव्हती, शाळा ला वर्ग नाही ,वर्ग असले तर शिक्षक नाही. इथली लोक शिकली तरी नोकरीसाठी मुंबई नाहीतर पुणे ला येतील.

उद्धव जी ...हे साहेबांच्या प्रेरणातून आत्मसात केले आणि मी अंमलबजावणी केली.

१९९५ मध्ये पुन्हा युतीचे सरकार आले आणि त्यावेळी सिंधुदुर्गल देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. या जिल्ह्याचा जो विकास झाला त्यासाठी माझ पण श्रेय महत्त्वाचे आहे. लोकांना ते चांगलचं माहीत आहे. माझी माननीय उध्दवजी तुम्हाला माझी विनंती आहे, येथे विमानतळ होऊ देणार आहेत. जवळच रेडी बंदर आहे मुंबई-गोवा महामार्ग त्यावेळी रोखण्यात आला होता. परिस्थिती बदलते मला माहित आहे. माझ्या काळात जेवढा विकास झाला तेवढा अजूनही झालेला नाही. गोवा-मुंबई महामार्गाच्या विकासामध्ये कंत्राटदारांना कोण आडवतं ते मला चांगलंच माहित आहे.

आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री यांनी इथला अभ्यास करावा, निसर्ग कसा असावा याचा अभ्यास करावा, माझ्यावेळेस धरणाची कामे झाली आज १ टक्के पण विकास नाही, कसला विकास? विमानतळ झल्यावर लोकांनी काय पाहावं? रस्ते खड्डे? कसला विकास आहे हा ? आदित्य ठाकरे माझ्यासाठी टॅक्स फ्री आहेत.

विनायक राऊतांनी पेढ्याचा गुणधर्म आत्मसात करावा. असा टोमणाही यावेळी नारायण राणे यांनी लगावला.उद्धव ठाकरे याची काम करून दाखवा, लोकप्रतिनिधी काय करतात याची चौकशी करण्यासाठी कुणालातरी नेमा.

मात्र सध्या आंदोलन करणारे लोक आता मंचकावर आहेत हे दुर्देवी आहे. भरकार्यक्रमात नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आवाहन केले. तसेच कोकणाचा विकास करण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मी इथल्या देवदेवतांना या लोकांची इडापिडा टळो यासाठी देवाला प्रार्थना यावेळी प्रार्थना करतो. विनायक राऊतांनी पेढ्याचं गुणधर्म आत्मसात करावा असा टोमणाही यावेळी नारायण राणे यांनी लगावला. इथेच थांबून मी मंचकावर उपस्थितांचे आभार मानतो.

Related Stories

No stories found.