'एकत्र आलेत ठाकरे आणि राणे, मला आठवते युतीचे गाणे,' आठवलेंची पुन्हा युतीसाठी साद

मी देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केल्याच्या आठवणींना रामदास आठवले यांनी यावेळी उजाळा दिला.
'एकत्र आलेत ठाकरे आणि राणे, मला आठवते युतीचे गाणे,' आठवलेंची पुन्हा युतीसाठी साद
'एकत्र आलेत ठाकरे आणि राणे, मला आठवते युतीचे गाणे,' आठवलेंची पुन्हा युतीसाठी सादSaam Tv

रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात एका कवितेने केली. राजकारण बाजूला ठेऊन आम्ही एकत्र आलो.स गळीकडे राजकारण जरुरी नाही. बेरोजगारांना देखील संधी मिळाली पाहिजे असे देखील ते यावेळी म्हणले. इथे एकत्र आले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे मला आठवले युतीचे गाणे अशी किवता देखील रामदास आठवले यांनी आपल्या छोटेखानी भाषणात म्हंटली.

हे देखील पहा -

चिपी विमानतळाच्या उद्घटनासाठी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे दोघे एकत्र आले आहेत. नारायण राणे यांनी मला अगोदरच सांगितले आहे की, माझे मुख्यमंत्र्यांशी कोणतेही वैर नाही. उद्धव ठाकरे यांनी देखील नारायण राणे यांच्यासोबत काम केले आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती होती तेव्हा मी देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केल्याच्या आठवणींना रामदास आठवले यांनी यावेळी उजाळा दिला. चिपी विमानतळासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.