२५०० रुपयांत मुबंई ते सिंधुदुर्ग प्रवास; जाणून घ्या विमानाची वेळ

२५०० रुपयांत मुबंई ते सिंधुदुर्ग प्रवास; जाणून घ्या विमानाची वेळ
vinayak rautSaamTV

सिंधुदुर्ग : केवळ २५०० रुपयांत सिंधुदुर्ग ते मुंबई असा विमान प्रवास कोकणवासीयांना लवकरच उपलब्ध होणार आहे. आपल्या सर्वांसाठी ही आनंददायी गाेष्ट असून चिपी विमानतळाबाबत आम्हाला काेणालाही श्रेय घेण्याचा प्रश्नच येत नाही. या विमानसेवेमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातच नव्हे तर काेकणात पर्यटक वाढतील असे खासदार विनायक राऊत यांनी येथे पत्रकार परिषदेत नमूद केले. chipi-airport-sindhudurg-mumbai-flight-2500rs-ticket-vinayak-raut-addressed-media-kokan-news-sml80

vinayak raut
काम काेणाचा नाचतय काेण! राजेंच्या बॅनरवरुन चर्चाच चर्चा

सिंधुदुर्ग ते मुंबई प्रवासी विमान सेवा लवकर सुरु हाेणार असल्याने त्याची माहिती देण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. राऊत म्हणाले हे विमानतळ कोणी सुरु केले ही बाब महत्त्वाची नाही. विमानतळ सुरू होऊन काेकणवासियांना सेवा मिळावी हा उद्देश आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय हवाई वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समवेत आम्ही सर्वजण उदघाटना समारंभासाठी उपस्थित राहू. या विमानतळासाठी तत्कालीन नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी माेलाची मदत केली आहे. त्यांना देखील उदघाटन समारंभासाठी बोलवले जाणार असल्याचे खासदार राऊत यांनी नमूद केले.

सिंधुदुर्ग ते मुंबई प्रवासी विमान सेवा २५०० रुपयांत नागरिकांसाठी उपलब्ध हाेईल. हे विमान दररोज दुपारी १२ वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण घेईल तसेच दुपारी एक वाजून ३५ मिनिटांनी सिंधुदुर्गहून पुन्हा मुंबईसाठी रवाना हाेईल असे खासदार राऊत यांनी सांगितले.

दरम्यान या विमानतळाच्या चारी बाजूंनी रस्त्याची जाेड असल्याने पिंगुळी ते चिपी हा रस्ता उद्घाटनापर्यंत खड्डेमुक्त केला जाईल. याबराेबरच पावसाळ्यानंतर सर्व रस्ता उत्तम पद्धतीचा करु असे आश्वासन खासदार राऊत vinayak raut यांनी दिले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.