Chitra Wagh On Controversy: 'मलाच घाणेरड्या पद्धतीने....' उर्फी जावेद प्रकरणात चित्रा वाघ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Chitra Wagh Vs Urfi Javed: उर्फी जावेदने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फी जावेदवर निशाणा साधला.
Chitra Wagh News
Chitra Wagh NewsSaam TV

Chitra Wagh: राज्याच्या राजकारणात सध्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे. उर्फी जावेदचा नंगा नाच मी चालू देणार नाही, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती. ज्यानंतर या सगळ्या वादाला सुरूवात झाली होती. या प्रकरणात उर्फी जावेदने चित्रा वाघ यांची महिला आयोगाकडे तक्रार केल्याचीही माहिती समोर आली आहे.

याच पार्श्वभूमीवर चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी पत्रकार परिषद घेत उर्फी जावेदवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे.

Chitra Wagh News
MPSC Protest: एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक! 'या' प्रमुख मागणीसाठी पुकारले राज्यव्यापी आंदोलन

उर्फी जावेदने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फी जावेदवर निशाणा साधला. उर्फीचा नंगानाच महाराष्ट्रात चालू देणार नाही असे त्यांनी यावेळी पुन्हा एकदा ठणकावले आहे.

यावेळी बोलताना "माझा वाद हा त्या बाईशी नसून तिच्या विकृतीशी आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. छत्रपती शिवरायांच्या पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभत नाही. तसेच हे माझ्या घरासाठी करत नसून समाजासाठी करत आहे, मात्र मलाच घेरण्यासाठी सगळे उभे राहिले आहेत. तरीही कोणी सोबत नसले तरी मी हा लढा सुरू ठेवणार" असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. त्याचबरोबर हा नंगानाच तुम्हाला मान्य आहे का?" असा सवालही त्यांनी विरोधकांना केला.

Chitra Wagh News
Nashik Road Accident Latest Updates : नाशकात दुस-यांदा माेठा अपघात, भुजबळ व्यथित; नेटीझन्सनी फडणवीसांना घेरलं

यावेळी पुढे बोलताना "या प्रकरणाबद्दल घाणेरड्या पद्धतीने मला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मला आज त्रास होतोय, मात्र मी एकाकी नाही, मला महाराष्ट्रातील माता माऊलींनी सपोर्ट केला आहे. आज आवाज उठवला नाही तर हा नंगानाच महाराष्ट्रभर सुरू होईल," असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

दरम्यान, या प्रकरणात उर्फी जावेद (Urfi Javed) राज्य महिला आयोगांची भेट घेणार असून या भेटीसाठी ती महिला आयोगाच्या कार्यालयात दाखल झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com