
Lavani Dancer Gautami Patil News: लावणी कलावंत (Lavani Dancer) गौतमी पाटील सध्या चांगलीच चर्चेत आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना सध्या तुफान गर्दी होत आहे. तिच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांची होणारी गर्दी, हुल्लडबाजीच्याही अनेक घटना समोर येत असतात. मात्र एकीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असतानाच, गौतमीमुळे लावणीची बदनामी होत असल्याची टीकाही वारंवार होत आहे.
काही दिवसांपूर्वीच किर्तनकार निवृत्तीमहाराज इंदुरीकरांनीही तिच्या मानधनावरुन टीका केली होती. यानंतर आता जेष्ठ तमाशाकलावंत रघुवीर खेडकर यांनीही गौतमी पाटीलला मिळणाऱ्या मानधनावरुन जोरदार टीका केली आहे. (Latest Marathi News)
काय म्हणाले रघुवीर खेडकर..?
बऱ्याच गावातले लोक हे १०० लोकांच्या तमाशा कार्यक्रमाला २ लाख रूपये देण्यासाठी गयावया करतात. विनंती करतात, मात्र गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात चार मुली आणि पाचवी गौतमी पाटील यांना पाच-पाच लाख रूपये मोजतात. याला काय म्हणायचं? असं म्हणत ज्येष्ठ लोक कलावंत रघुवीर खेडकर यांनी खंत व्यक्त केली आहे. तसंच लोककलेची गौतमी पाटील होऊ देऊ नका असंही त्यांनी म्हटलं आहे.
पालकांनी लक्ष देण्याची गरज...
यावेळी पुढे बोलताना त्यांनी आपली मुलं कोणत्या वळणाला चालली आहेत? आई वडिलांचं लक्ष कुठे आहे? तुम्ही स्वतःला पालक समजता ना? मग आपला मुलगा रात्री कुणाच्या कार्यक्रमाला जातो हे विचारत का नाही? आज तुमच्या मुलांना हरिपाठ पाठ नाही पण गौतमी पाटीलची गाणी पाठ आहेत. काय चाललंय काय? तमाशाला आजवर तुम्ही नावं ठेवत होतात आजपर्यंत, आता काय चाललं आहे लक्ष द्या.” असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
महाराष्ट्राचा बिहार होईल...
महाराष्ट्र (Maharashtra) कोणत्या दिशेने चालला आहे? पुढाऱ्यांचं तर लक्ष नाही या गोष्टीकडे. यावर सगळ्यांनीच लक्ष ठेवलं पाहिजे. कुठली कला, कुठली कलावंत काय करते आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे अन्यथा महाराष्ट्राचा बिहार (Bihar) होईल, अशा शब्दात त्यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर जोरदार टीका केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.