
- संजय राठोड
यवतमाळ : यवतमाळ (yavatmal) पालिकेचे मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची बदली थांबविण्यासाठी सामाजिक, राजकीय संघटनांनी आज यवतमाळ शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. हे आवाहन समाज माध्यमातून (social media) करण्यात आले आहे. या बंदला सर्व शहरवासियांनी पाठींबा द्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे. (Yavatmal Latest Marathi News)
यवतमाळ पालिकेच्या मुख्याधिकारी मडावी यांची मंगळवारी सायंकाळी बदली झाल्याचा आदेश धडकला. यामुळे विविध संस्था, संघटनांसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले. मडावी यांची बदल थांबवावी यासाठी रात्री उशिरापर्यंत पालिकेसमोर काहींनी ठिय्या मांडला.
मडावी यांची बदली नियमबाह्य असल्याचा म्हणणे आंदाेलकांचे आहे. दरम्यान आज विविध संघटनांनी यवतमाळ शहर बंदची हाक दिली आहे. समाज माध्यमांवर तशा पोस्ट व्हायरल झाल्या आणि होताहेत. आज सकाळी अकरा वाजता संविधान चौकात नागरिकांनी एकत्र यावे असे आवाहन देखील पोस्टमधून करण्यात आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.