Malkapur Bus Depot : मलकापूर बस स्थानकात राडा; आगारप्रमुखांवर जमावाचा हल्ल्याचा प्रयत्न

सध्या घटनास्थळी पाेलीस फाैजफाटा आहे.
malkapur bus stand, buldhana news, police, bus driver , youth
malkapur bus stand, buldhana news, police, bus driver , youthsaam tv

Malkapur Breaking News : राज्य परिवहन महामंडळाच्या मलकापूर आगार प्रमुखांवर आज जमावानं जीवघेणा हल्ला केला. यामधून आगार प्रमुख थोडक्यात बचावले आहेत. एका बसमुळं दाेन युवकांचा (youth) हात कापल्यानं जमावानं बस (msrtc bus) स्थानकात राडा घातला. या जमावाकडून बस स्थानकातील कक्षाची तोडफोड करण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर - पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी युवक रस्त्याच्या कडेला पोलीस भरतीसाठी व्यायाम करीत असतात. याच मार्गावरून मलकापूर आगाराची बस निघाली हाेती. या बसच्या चालकाच्या मागील बाजूचा पत्रा तुटून बाहेर आलेला होता. त्यामुळे व्यायाम करणाऱ्या तरुणांना या पत्र्याचा धक्का लागून दोन तरुणांचे हात कापले गेले. या घटनेची माहिती गावात समजली. त्यामुळं भंगार बस रस्त्यावर का आणली गेली याचा जाब विचारण्यासाठी जमाव मलकापूर आगारात गेला. तेथे जमावानं आगार प्रमुखावर जीवघेणा हल्ला केला.

malkapur bus stand, buldhana news, police, bus driver , youth
Bilkis Bano Case : बिल्कीस बानोंवरील अन्याय दूर करा; हजाराे मुस्लिम महिला उतरल्या रस्त्यावर

काहींनी आगार प्रमुखाच्या कक्षात जाऊन तोडफोड केली. यामुळं आगार प्रमुख दराडे हे भयभीत झाले. त्यांनी तेथून पळ काढला. तसेच ते डेपोमधील एका जागेत जाऊन लपले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (police) बस स्थानकात धाव घेतली. या घटनेने मलकापूर बस स्थानकात एकच गोंधळ उडाला. सध्या घटनास्थळी पाेलीस फाैजफाटा आहे.

Edited By : Siddharth Latkar

malkapur bus stand, buldhana news, police, bus driver , youth
Msrtc Bus : बसचा फाटलेला पत्रा लागल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्या युवकांचा हात तुटला

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com