Weather Alert : कोल्हापूरकर गारठले! पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट

कोल्हापूर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढत असल्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
Winter Season
Winter Seasonsaam tv

रणजीत माजगावकर

कोल्हापूर - गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरकर (Kolhapur) कडाक्याच्या थंडीने गारठले आहेत. सहा वर्षानंतर पहिल्यांदाच पाऱ्याची निश्चयांची घसरण झाल्याने कोल्हापूरकरांना हुडहुडी भरलेली आहे. राज्यसह कोल्हापुरात देखील थंडीची लाट आलेली आहे. या थंडीमुळे कोल्हापूरकर अक्षरशः गारठलेले आहेत. काही जण थंडीचा (Winter Season) आनंद घेण्यासाठी सकाळी सकाळी रंकाळा परिसरात व्यायाम करण्यासाठी जात आहेत. तर काहीजण सकाळच्या कोवळ्या उन्हात आनंद घेण्यासाठी उद्यान परिसरात जमत आहेत.

Winter Season
Wardha News: रेल्वेच्या थांब्यासाठी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

कोल्हापूरसह परिसरात किमान तापमान 14 .8 अंश सेल्सिअस पर्यंत आलं होतं. गेल्या सहा वर्षातील ही निश्चयांकित नोंद असून दिवसेंदिवस पारा घसरत असल्याने त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम जाणवत आहे. कोल्हापूर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढत असल्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. कारण या थंडीत या थंडीचे जसे फायदे आहेत तसे तोटेही सहन करावे लागतात.

जसं 'आला पावसाळा आरोग्य सांभाळा' अगदी तशीच गत आता 'आला हिवाळा आपलं आरोग्य सांभाळा' असं म्हणण्याची वेळ आलीय. एरवी रात्रीपर्यंत गर्दीने फुललेल्या शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वर्दळ सायंकाळ नंतर जाणवत नाही. सध्या कोल्हापूरकर या थंडीपासून वाचण्यासाठी गरम आणि उबदार कपड्यांचा वापर तर करत आहेतच पण शेकोटीचाही आनंद घेत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com