सिंधुदुर्गातील नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे

सध्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
सिंधुदुर्गातील नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे
सिंधुदुर्गातील नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावेअनंत पाताडे

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 25 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

हे देखील पहा -

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील तिलारी, कर्ली आणि वाघोटन नदीमधील पाणी पातळीत वाढ होऊन इशारा पातळीपर्यंत पोहचली आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे, महसूल, पोलीस, जिल्हा परिषद यंत्रणा सज्ज असून सावधानतेचा इशारा दिला आहे.

सिंधुदुर्गातील नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे
प्रवाशांनो महाडकडे जाणे टाळा !

कणकवली येथील गड नदीमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने काही ठिकाणच्या लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी पाणी आल्याने वाहतूक बंद केली आहे. करुळ आणि भूईबावडा घाट बंद असून फोंडा आणि आंबोली मार्गे अजून वाहतूक सुरू आहे. आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्याने नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com