गँगवॉरमुळे शहर हादरले! टोळीकडून एकाची गोळी झाडून हत्या
गँगवॉरमुळे शहर हादरले! टोळीकडून एकाची गोळी झाडून हत्या संतोष जोशी

गँगवॉरमुळे शहर हादरले! टोळीकडून एकाची गोळी झाडून हत्या

टोळीकडून एकाची गोळी झाडून हत्या

नांदेड : काल रात्री एका जुन्या भांडणाच्या वादावरून गँगवॉर Gangwar झाला आहे. या गँगवॉरमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. एका गुंडाची गोळी झाडून निर्घृण हत्या Murder करण्यात आली आहे. विक्की ठाकूर असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे.

रात्रीच्या सुमारास विक्की ठाकूर गाडीपूरा Gadipura भागात घरासमोर थांबला असताना, दोन दुचाकीवर आलेल्या गुंडांनी विक्की वर बंदुकीतून गोळ्या झाडण्यास firing सुरुवात केली, आपल्यावर हल्ला होत असल्याचे लक्षात येताच विक्की ठाकूरने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, टोळक्याने विक्कीचा सिनेस्टाईल Cinestyle पाठलाग करुन त्याच्या डोक्यात गोळी झाडली आहे.

हे देखील पहा-

हे गुंड एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी विक्कीच्या अंगावर तलवारीने सपासप वार देखील केले आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विक्की ठाकूरचा जागीच मृत्यू झाल्याची खात्री झाल्या नंतरच हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या हल्लेखोरांनी पसार होत असताना देखील हवेत गोळीबार Firing करत दहशत निर्माण केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस Police घटनास्थळावर पोहचले.

गँगवॉरमुळे शहर हादरले! टोळीकडून एकाची गोळी झाडून हत्या
दहिसर मध्ये ज्वेलर्स दरोड्यात मालकाची गोळी झाडून हत्या ! --- (पहा व्हिडीओ)

आरोपीला शोधण्याकरिता एक पथक तयार करण्यात आले आहे. दरम्यान, शहरामधील कुख्यात गुंड कैलास बिगानियाच्या टोळक्याने विक्की ठाकूर याची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असल्याचे सांगण्यात येते आहे. गुंड विक्की ठाकूर विरोधात शहरात ५ गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती ही पोलिसांनी यावेळी दिली आहे. या प्रकरणी अज्ञात ६ जणांविरोधात इतवारा Itwara पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com