CJI DY Chandrachud Maharashtra Connection: न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे महाराष्ट्राशी काय आहे नाते? जाणून घ्या

Who Is CJI Dhananjaya Y. Chandrachud: न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे महाराष्ट्राशी काय आहे नाते? जाणून घ्या
CJI Dy Chandrachud Maharashtra Connection
CJI Dy Chandrachud Maharashtra ConnectionSaam TV

>> तुषार ओव्हाळ

CJI DY Chandrachud Maharashtra Connection : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ आज आपला निकाल जाहीर करणार आहे. यातच पाच न्यायाधीशांच्या घटनापीठातील सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. डीवाय चंद्रचूड यांचं महाराष्ट्राशी घट्ट असं नातं आहे. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊ...

CJI Dy Chandrachud Maharashtra Connection
SC Hearing On Maharashtra Political Crisis : ''16 नाही 39 आमदार अपात्र ठरणार''

CJI Dy Chandrachud Maharashtra Connection : मूळचे महाराष्ट्राचे आहेत धनंजय चंद्रचूड

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड मूळचे महाराष्ट्राचे.११ नोव्हेंबर १९५९ साली मुंबईत जन्म. चंद्रचूड यांचे वडील यशवंत चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयात सर्वाधिक काळ सरन्यायाधीश होते. धनंजय चंद्रचूड यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई आणि दिल्लीत झालं.  (Latest Marathi News)

CJI Dy Chandrachud Maharashtra Connection
Political News: सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या काही तास आधीच कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकमांची महत्वाची प्रतिक्रिया

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस केली होती सुरु

दिल्ली विद्यापीठातून चंद्रचूड यांनी अर्थशास्त्र आणि कायद्यात पदवी घेतली आहे. तर हार्वडमधून त्यांनी कायद्यात मास्टर्स पूर्ण केलं. १९९८ साली त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. त्याच वर्षी चंद्रचूड यांची भारताच्या अधिवक्ता म्हणून नियुक्ती. २००० साली चंद्रचूड यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी निवड.

Youngest Judge in India : सर्वात तरुण न्यायाधीश

वयाच्या ३९ व्या झालेले सर्वात तरुण न्यायाधीश म्हणून चंद्रचूड ओळखले जातात. २००० ते २०१३ अशी १३ वर्ष मुंबई उच्च न्यायालयात ते न्यायाधीशपदी होते. २०१६ साली अलाहाबाद कोर्टात त्यांची बदली झाली. २०२१ साली सर्वोच्च न्यायालयात ते न्यायमूर्ती झाले. ऑक्टोबर २०२२ मध्ये सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली.

राइट टू प्रायवसी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सबरीमाला, मध्य प्रदेशचा सत्तासंघर्ष सारख्या मोठ्या प्रकरणांवर त्यांनी सुनावणी केली आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीवेळी उद्धव ठाकरे यांचे एक पत्र त्यांनी अस्खलित मराठीत वाचलं. आता चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com