औरंगाबाद मध्ये 15 जुलैपासून कोरोनामुक्त गावात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात १५ जुलैपासून कोरोनामुक्त असलेल्या गावात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत.
औरंगाबाद मध्ये 15 जुलैपासून कोरोनामुक्त गावात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू
औरंगाबाद मध्ये 15 जुलैपासून कोरोनामुक्त गावात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरूSaam Tv

माधव सावरगावे

औरंगाबाद : औरंगाबाद Aurangabad जिल्ह्यात १५ जुलैपासून कोरोनामुक्त Corona असलेल्या गावात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. पालकांच्या संमतीने औरंगाबाद जिल्ह्यातल्या ४४६ कोरोनामुक्त गावातील जवळपास ७५९ माध्यमिक शाळा गजबजणार आहेत. Classes 8th to 12th start from July 15 in Aurangabad

हे देखील पहा-

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यात शाळा भरवण्यासाठी संशोधन, सर्वेक्षण Survey केले होते, त्यात औरंगाबाद जिल्ह्यात १२ हजार ९८८ पालकांची मते घेण्यात आली. त्यातील जवळपास ८५ टक्के पालकांनी प्रत्यक्ष शाळा भरवण्यास संमती दिली आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने एक बैठक घेऊन मुख्याध्यापकांची मते जाणून घेतली गेली. त्यासोबतच शाळा कशा सुरू करायच्या याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १५ जुलैपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात येतील. एकूण क्षमतेच्या निम्म्यावर वर्गात विद्यार्थी बसवण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद मध्ये 15 जुलैपासून कोरोनामुक्त गावात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू
साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर सापडला ऐतिहासिक अमूल्य ठेवा

कोरोनाबाबतचे नियम, सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी एका बाकावर एक विद्यार्थी बसवण्याचा सूचना करण्यात आल्यात. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही शाळा आणि वर्ग प्रत्यक्ष भरू शकत नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढत चालली आहे. प्रत्यक्ष वर्ग भरत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आकलन होत नाही. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना मोठी अडचण येऊ शकते असं पालकांचे मत आहे. सोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध साधनांचा अभाव असल्याने ग्रामीण भागातील पालकांचाही कल आणि आग्रह प्रत्यक्ष शाळा भरण्यावर असल्याचं दिसून आलं.

काळजी घेऊन, जबाबदारीने शाळा सुरू कराव्यात अशा सूचनाही अनेक पालकांनी केल्या आहेत. देशाच्या, समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रत्यक्ष वर्ग भरणे हेच महत्त्वाचे असल्याचेही काही पालकांची मतं आहेत. ही मतं जाणून घेतल्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेकडून मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कोरोना नियमांचे पालन करून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबद्दल सूचना करण्यात आल्या आहेत.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com