'सुंदर बीड' हेच का? जागोजागी दिसतायत तुंबलेली गटारे अन् चिखलमय रोड

विद्यार्थ्यांना सोसावा लागतोय मनस्ताप...
Roads In Beed
Roads In Beedविनोद जिरे

विनोद जिरे

बीड: पहिल्याच पावसात बीड शहरात नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे तुंबलेल्या नाल्या आणि उखडलेले रस्ते यामुळें रस्ते चिखलमय झाले आहेत. याचा विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. चिखलातून सायकल चालत नाही मग डोक्यावर घ्यावी का ? असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

बीड शहरात (Beed) पहिल्याच पावसाने नागरिकांची तारांबळ उडवलीय. शहरातील राजमुद्रा नगर , जिजाऊ नगरमध्ये तर अक्षरशा विद्यार्थ्यांना सायकल डोक्यावर घेऊन जाण्याची वेळ आली आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच शाळा सुरू होत असल्याने, शाळेमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्साह आहे. मात्र, पावसाळ्यात रस्त्याच्या अडचणींमुळे शाळेत जावं कसं? असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत. याच रस्त्याचा मनस्ताप सहन करणाऱ्या महिलांनी संताप व्यक्त केला आहे. रस्ता चिखलमय असल्यामुळे दूधवाला देखील या ठिकाणी येत नाही, तसेच शाळेला जाणारा रिक्षा, बस आमच्या घरापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे, मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. तर अनेक विद्यार्थी रस्त्यावर घसरून पडून जखमी देखील झाले आहेत, असं महिला पालकांनी सांगितले.

Roads In Beed
राखी सावंतला आठवली तिची चूक; ...अन् मग बॉयफ्रेंडसमोर चेहरा लपवून पळाली

सुविधेचा नावाखाली जास्तीचा कर वसूल करणाऱ्या बीड नगरपालिकेकडून मात्र, सुविधा दिल्या जात नाहीत. रस्त्यावर लाखो रुपये खर्च केले जातात ते जातात कुठे गेले? माझा मुलगा शाळेत जात असताना चिखलात पडून जखमी झालाय. दवाखान्यात पैसे भरावे लागत असल्याच नागरिकांनी सांगितलं. खोदून टाकलेल्या रस्त्यामुळे पडून अनेकांचे अपघात होतात. यामध्ये राजकारण करण्यापेक्षा रस्ते दुरुस्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने प्रयत्न करावा, असा संताप देखील नागरिकांनी व्यक्त केला.

हे देखील पाहा-

दरम्यान, पहिल्याच पावसाने (Rain) बीड शहरातील अनेक भागातील नागरिकांची दाणादाण उडवली आहे. रस्ते चिखलमय झालेत तर काही भागांमध्ये खांदुन ठेवलेले रस्ते आता शहरवासीयांची डोकेदुखी बनत चालले आहेत. दुचाकी, सायकल घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे किमान मोठा पावसाळा सुरू होण्यापूर्वी, शहरातील रस्ते तात्काळ करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com