
जालना : भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज जालन्यातील (Jalna) पाणी टंचाई विरोधात जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चा दरम्यान भाषण करताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. (Jal Aakrosh Morcha)
भाषणात फडणवीस म्हणाले, 'मला कोणी तरी विचारलं हे सरकार कसं चालतं आहे, मी त्यांना म्हणालो, 'मुख्यमंत्री कार चालवतात आणि सरकार भगवान चालवत, हे सरकार ईश्वर भरोसे आहे. तसंच फडणवीसांच्या भाषणादरम्यान पावसाच्या सरी पडल्या त्यावेळी ते म्हणाले ' आज माझ्या लक्षात आलं सरकार खरंच ईश्वर भरोसे आहे कारण, मुख्यमंत्र्यांना आम्ही पाणी मागायला निघालो त्यांनी आम्हाला पाणी दिलं नाही, पण ईश्वराने आम्हाला पाणी दिलं असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
फडणवीस पुढे म्हणाले, हा मोर्चा भारतीय जनता पक्षाचा (BJP) नाही, तर सर्व सामान्य जनतेचा हा मोर्चा आहे. या शहराला पाणी मिळावं म्हणून शिष्टमंडळ आलं त्यावेळी मी प्रस्ताव तयार केला १२९ कोटी मी त्यांना दिले. मात्र ती योजना टीच भरही पुढे गेली नाही. १२९ कोटी रुपये खर्च नाही झाले तर तुम्ही काय कराल? मी म्हटलं, त्यांच्या पक्षाला विचारा, मुख्यमंत्र्यांना विचारा. १२९ कोटी रुपये दिल्यानंतर जालनेकरांच्या नळाला पाणी येत नसेल तर तुम्हाला राज्यसर्ते म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? हा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.
हे देखील पाहा -
तसचं संभाजीनगर मोर्चा झाला आणि कामाला सुरुवात झाली. आपलं सरकार असताना दुष्काळ मुक्ती होती. मराठवाडा वाटर ग्रीडचा योजनेचा माध्यमातून एक ही गाव पाण्यापासून वंचीत राहणार नाही हे काम केलं. मात्र, या सरकारने मराठवाडा वाटर ग्रीडचा खून केला. मराठवाडा ग्रीडच काम झालं असत तर दुष्काळ पडला नसता असंही ते म्हणाले.
समुद्रातून वाहणार पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा प्लॅन तयार केला मात्र या सरकारने त्याचाही खून केला. मी येत असताना मला शेततळी दिसली, ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला तळी दिली. मात्र या सरकारने ती योजना बंद करू शेतकऱ्यांचं खून केला. मराठवाड्याला मी असताना निधी देत होतो. मात्र, हे सरकार आलं आणि यांनी मराठवाडाचे कवच कुंडल मारून टाकली. हे सत्तेत खुश आहेत,हे टक्केवारीत खुश आहेत कारण यांच सरकार आहे.
माझा सवाल आहे, ज्या ज्या वेळी मी जे मागितलं ते दिल यांच्या अडीच वर्षात मुख्यमंत्री आलेच नाहीत. मात्र, एक फुटकी कवडी देखील मिळाली नाही. आम्ही उद्योगाला सवलती दिल्या, या सरकारने मराठवाडा आणि विदर्भाच्या सवलती काढून टाकल्या म्हणून ३५ हजार कोटी दिले, ते पैसे ही हे खर्च करू शकले नाहीत. हा मोर्चा म्हणजे चॅलेंज आहे. आम्ही तुम्हाला या ठिकाणी झोपू देणार नाही. सामान्य माणसाला न्याय मिळावा हादोन दिवस नाही तर रोज पाणी मिळे पर्यंत आम्ही संघर्ष करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.