Video : काल कुस्ती, आज दोस्ती; पुलाच्या उद्घाटन सोहळ्याला शिंदे-आव्हाड दिसले एकाच मंचावर

कळवा पुलाचे उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड एकाच मंचावर पाहायला मिळाले.
eknath shinde and jitendra awhad
eknath shinde and jitendra awhad saam tv

Eknath Shinde News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना शनिवारी विवियाना मॉल प्रेक्षक मारहाणी प्रकरणी जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. मात्र, आज, रविवारी ठाण्यातील कळवा पुलाचे उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड एकाच मंचावर पाहायला मिळाले. या सोहळ्यात शिंदे-आव्हाडांनी एकमेकांना कोपरखळ्या देखील लगावल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

ठाण्यातील कळवा पुलाचे उद्घाटन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. उद्घाटन सोहळ्यातील उपस्थित आव्हाडांना मुख्यमंत्र्यांनी कोपरखळ्या लगावल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले, 'आम्ही जनतेचे काम करणारे आहोत. ज्यात लोकांचा फायदा तेच काम आपल्याला करायचं आहे'.

मुख्यमंत्री शिंदे झालेल्या कामांची माहिती देत असताना आव्हाडांकडून देखील काम पूर्ण झालं असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तांत्रिक बाबींविषयी बोलत असल्याचे सांगितले. तर यावेळी जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) देखील पूलाच्या कामावरून मुख्यमंत्र्यांना कोपरखळ्या लगावल्या.

eknath shinde and jitendra awhad
सुषमा अंधारेंनी विभक्त पतीच्या शिंदेंच्या पक्षातील प्रवेशावर दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

दरम्यान, कळवा पुलाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासहित खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पालिका आयुक्त अभिजित बंगार हे देखील उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com