
Eknath shinde News: भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. २००० रुपयांच्या नोटा वितरणातून काढण्याच्या निर्णयावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांकडे नोटा जास्तीच्या असतील म्हणून त्यांना त्रास होत आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. (Latest Marathi News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालघरमधील बोईसरच्या दौऱ्यावर आहेत. बोईसरमध्ये आधार प्रतिष्ठान आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'नोटाबंदी हा निर्णय आरबीआयचा असून तो काय सरकारचा किंवा पक्षाचा नाही. त्यामुळे विरोधकांनी उगाचच यावर चर्चा करू नये. नोटाबंदीसाठी आरबीआयने मुदत दिलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कुठलाही त्रास होणार नाही'.
'विरोधकांकडे नोटा जास्तीच्या असतील म्हणून त्यांना त्रास होतो की काय असा टोला या वेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेला विरोधकांकडून काय प्रत्युत्तर दिलं जातंय हे पाहावं लागणार आहे.
दरम्यान, बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवस्थापनासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली असून स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार कसा देता येईल याचा कंपन्यांनी विचार करावा अस आवाहन केलं. कोणी त्रास देत असेल तर थेट आमच्याशी संपर्क करा, आम्ही रोजगार देणाऱ्यांच्या पाठीशी आहोत, असं आश्वासन यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपस्थित कंपनी मालकांना दिला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.