CM Eknath Shide Rally: '४० आमदारांनी घेतलेला निर्णय ही मोठी क्रांती...' गजानन किर्तीकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Maharashtra Politics: रत्नागिरीतील खेडमध्ये असलेल्या गोळीबार मैदानात शिंदेंनी सभा घेतली आहे.
gajanan kiritkar and eknath shinde
gajanan kiritkar and eknath shinde saam tv

Shivsena Rally Khed: पाच मार्च रोजी खेडच्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांची जाहीर सभा झाली होती. खेडच्या सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या ४० आमदारांवर सडकून टिका केली होती. त्यांच्या या सभेला उत्तर देण्यासाठी आज एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) त्याच मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

या सभेतून शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच कार्यक्रमात लाव रे तो व्हिडिओ म्हणत उद्धव ठाकरेंचे भाषणही दाखवले ज्यामध्ये त्यांनी पवारांवर केलेल्या टीकेचा उल्लेख करण्यात आला होता. यावेळी गजानन किर्तीकर यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली.

gajanan kiritkar and eknath shinde
Beed News: माझी सर्व जमीन बिनशर्त तुमच्या नावावर करतो..., बीडच्या शेतकऱ्याचं थेट पंतप्रधान मोदींना चॅलेन्ज

काय म्हणाले गजानन किर्तीकर...

खेडच्या सभेत गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ज्यामध्ये त्यांनी "ठाकरेंच्या भोवती असणाऱ्या १०- १५ लोकांनी शिवसेनेची वाट लावली. आता हिंदुत्व राहिलं नाही, विकास नाही त्यामुळेच आम्ही मोठा उठाव केला. ज्याची नोंद जगाने घेतली, असे म्हणत गुवाहाटीला जाण्याचा निर्णय," हा क्रांती असल्याचा उल्लेख केला.

तसेच पुढे बोलताना त्यांनी "एकनाथ शिंदेसारखा नेता मिळाला हे आमचं नशीब. ५० खोके म्हणून आम्हाला हिणवतात. पण परिस्थिती पाहून आम्हाला रहावतं नव्हतं. मात्र त्यांची पापे झाकण्यासाठीच आमच्यावर टीका केली जाते," असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

gajanan kiritkar and eknath shinde
India vs Australia : टीम ऑस्ट्रेलियाने उडवला धुव्वा; कांगारूंनी ६६ चेंडूत टीम इंडियाला गुंडाळलं

योगेश कदमांनीही साधला निशाणा...

यावेळी आमदार योगेश कदम यांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ज्यामध्ये त्यांनी ही "उत्तर सभा नसून जमलेले नागरिकचं उत्तर असतील. दापोलीतून कुणाची हा भगवा खाली आणण्याची हिमत नाही. ४८ पंचायती पैकी ४७ पंचायती आमच्या आहेत. उद्धवजी तुम्ही चुकलात आम्हाला डिवचलंत सभा घेऊन तुम्हचा पराभव नक्की करू, असे म्हणत ठाकरेंना थेट इशारा दिला. (Maharashtra Politics)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com