Eknath Shinde: 'लाव रे तो व्हिडिओ' मधून करारा जवाब; CM शिंदेंच्या सभेत वाजणार उद्धव ठाकरेंची भाषणे

Udhav Thackeray Vs Eknath Shinde: ही सभा आत्तापर्यंतची रेकॉर्डब्रेक सभा होणार असल्याचे शिंदे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे..
Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Saam TV

Ratnagiri: पाच मार्च रोजी खेडच्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांची जाहीर सभा झाली होती. खेडच्या सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या ४० आमदारांवर सडकून टिका केली होती. त्यांच्या या सभेला उत्तर देण्यासाठी आज एकनाथ शिंदेंची त्याच मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

त्यामुळे एकनाथ शिंदे आज उद्धव ठाकरेंवर कसा हल्लाबोल करणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी या सभेमध्ये 'लाव रे तो व्हिडिओ'च्या माध्यमातून ठाकरेंवर निशाणा साधणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

याबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गोळीबार मैदानावरील सभेत 'लाव रे तो व्हिडिओ'च्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना उत्तर दिले जाणार आहे. ठाकरेंनी आजपर्यंत 'शरद पवार' यांच्यासह काॅग्रेसवर केलेल्या टिकेचे व्हिडिओ लावून ठाकरेंना केलेल्या विधानांची आठवण शिवसेनेकडून करून दिली जाणार आहे.

तसेच ठाकरेंनी कोकणाकडे कसे दुर्लक्ष केलं, ठाकरेंना सोडून का ४० आमदार गेले याचं स्पष्टीकरण ही याच सभेच्या मंचावरून कोकणवासियांना दिलं जाणार आहे. त्यामुळे ठाकरेंच्या सभेला गोळीबार मैदानातील सभेतून 'करारा जबाब' दिला जाणार असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. (Maharashtra Politics)

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Panvel News : RPF जवान नसता, तर हा माणूस आज जिवंत नसता; थरारक घटना CCTVत कैद

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांवर दोन्ही बाजूला शिवसेना नेत्यांचे स्वागत फलक व भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. तसेच शहरातील गोळीबार मैदानावर होत असलेल्या सभेची तयारी आता पूर्ण झाली असून सभेचे व्यासपीठ व मैदानातील आसनव्यवस्था देखील आता पूर्ण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही सभा आत्तापर्यंतची रेकॉर्डब्रेक सभा होणार असल्याचे शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com