
Eknath shinde News : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय अस्थिरता आहे, असं विधान केलं होतं. त्यानंतर बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. बच्चू कडू यांच्या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Shinde News )
९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा उद्घान कार्यक्रम विर्दभात होत आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी बच्चू कडू यांच्या राजकीय अस्थिरतेच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री म्हणाले, 'आमच्याकडे १७० आमदार आहेत. हे सरकार स्थिर असल्याचे सांगण्याची गरज नाही. पुढच्या निवडणुकीतही हे सरकार येईल'.
सेवाग्राम आश्रमाबाबत मुख्यमंत्री म्हणाले, 'सेवाग्राम आश्रम येथील बापू कुटी पाहिल्यानंतर महात्मा गांधी यांच्या समर्पित सेवेची आठवण येतेय. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे. त्याला वंदन करायला येथे आलो. सेवाग्राम परिसरात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना विकासाचे कामे झाले होते.
'महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांवर आधारित अनेक आठवणी या परिसरात आहेत. त्याला वंदन करायला अनेक लोक येत असतात. या आठवणींना जतन करत इथे विकासाच्या दृष्टीने कामे करू आणि साऊंड लाईट शो करण्याच्या दृष्टीने ही प्रयत्न करू', असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
शिक्षक आणि पदवधीर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालावर मुख्यमंत्री म्हणाले, ' ही विशिष्ट प्रकारची निवडणूक होती. महाविकास आघाडीकडे तीन जागा होत्या आणि बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपकडे दोन जागा होत्या. कोकणातली जागा आम्ही जिंकली आणि नाशिकची जागा भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मदतीने अपक्षने जिंकली'.
'काही जागा जिंकल्या नाहीत. त्याची कारणमीमांसा केली जाईल आणि त्याबाबत विचार करून सुधारणा केली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुढे म्हणाले.
जुन्या पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्री म्हणाले, 'जुनी पेन्शनबाबत आमचे शिक्षण मंत्री आणि तो विभाग काम करत आहे. त्याबाबत विचार सुरू आहे. सरकार सर्व घटकांना न्याय देणार आहे. आम्ही शिक्षकांना अकराशे कोटींचे अनुदान दिले आहे. त्यांचा विचार केला पाहिजे'.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.