Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांनतर सुपुत्र श्रीकांत शिंदेंनी दिली संघाच्या कार्यालयाला भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

खासदार श्रीकांत शिंदे यांनी संघाच्या कार्यालयाला भेट दिली आहे.
Shrikant Shinde
Shrikant Shinde Saam tv

Nagpur News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयाला भेट दिली होती. त्यानंतर आता त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नागपुरातील संघाच्या कार्यालयाला भेट दिली आहे. (Latest Marathi News)

खासदार श्रीकांत शिंदे सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयाला भेट दिली. तसेच श्रीकांत शिंदे स्मृतीभवन परिसरात सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या स्मृती स्थळाचं दर्शन घेणार आहेत.

Shrikant Shinde
Mumbai-Goa Highway Update: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत मोठी अपडेट; नितीन गडकरींनी दिली महत्वाची माहिती

कार्यालयाला भेट दिल्यानंतर श्रीकांत शिंदे यांची संघ पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत खासदार कृपाल तुमाने आणि शिवसेना नेते किरण पांडव देखील होते. श्रीकांत शिंदे यांची पहिल्यांदाच संघाच्या स्मृती भवनाला भेट दिली आहे.

दरम्यान, नागपूरच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार शिंदे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 'कॉन्ट्रॅक्टरची भाषा काही लोकं करत आहेत. सोन्याचा चमचा घेऊन काही लोक आले आहेत. त्यांना बरोबर रेट माहिती आहे. कॉन्ट्रॅक्टरची भाषा त्यांना माहीत आहे. कारण 25 वर्षे त्यांनी तेच केले आहे. मला अजून उलगडायला लावू नका, असा इशारा श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.

Shrikant Shinde
The Kerala Story: 'द केरळ स्टोरी'चे निर्माते सुप्रीम कोर्टात जाणार, प. बंगालमधील बंदी उठवण्याची करणार मागणी

'मुख्यमंत्री महाराष्ट्रात लक्ष देत आहेत. कुठलाही भाग दुर्लक्षित होऊनये, विदर्भाला सुद्धा न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री करत आहेत. लोकांना जे हवं होतं ते सरकार स्थापन झालं आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकारने केलं. वातावरण बदलले आहे. त्यामुळे लोकांना हे आपलं सरकार वाटतं आहे. लोकांना सरकारकडून बऱ्याच अपेक्षा आहेत, असंही श्रीकात शिंदे यावेळी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com