Solapur: मुख्यमंत्र्यांचा देव-धर्म, पूजा-अर्चा यातच जास्त वेळ जातोय, यासाठी त्यांनी वेगळा मंत्री नेमावा: जयंत पाटील

Jayant Patil Criticized To CM Eknath Shinde: जयंत पाटील यांनी देव-धर्म, पूजा-अर्चा याबाबत केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Jayant Patil Criticized To CM Eknath Shinde
Jayant Patil Criticized To CM Eknath ShindeSaam TV

सोलापूर: मुख्यमंत्र्यांचा देव-धर्म, पूजा-अर्चा यातच जास्त वेळ जातोय, यासाठी त्यांनी वेगळा मंत्री नेमावा अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर (Eknath Shinde) केली आहे. जयंत पाटील हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. जयंत पाटील यांनी देव-धर्म, पूजा-अर्चा याबाबत केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Jayant Patil Latest News)

हे देखील पाहा -

सोलापूरात माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामकाजावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचा जास्त वेळ देव-धर्म, पूजा-अर्चा, होम-हवन यातच जातोय. जर मुख्यमंत्र्यांनी यातच जास्त वेळ घालवला तर जनतेची कामं कधी करणार? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांसारखा उत्तम प्रशासक या सरकारकडे असताना त्यांना दोन नंबरची जागा दिली गेली आहे. देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले असते तर वेगळी परिस्थिती होती, पण भाजपने असा कसा निर्णय घेतला माहिती नाही असा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांबाबत पाटील म्हणाले की, आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार लवकर स्थिर व्हावं आणि कामाला लागावं. त्यासोबतच देव-धर्म, पूजा-अर्चा करण्यासाठी एक स्वतंत्र मंत्री नेमून त्यांना एक खात द्यावं आणि बाकीच्यांनी कामाला लागावं. एकनाथ शिंदे यांच्यासोबतही आम्ही काम केलं आहे. मुख्यमंत्र्यांचा पूजा-अर्चेत जरा जास्त वेळ जातोय, त्यासाठी त्यांनी वेगळा मंत्री नेमावा आणि कामाला लागावं. सरकार चालवणं वेगळं आणि पोलिस स्टेशनला फोन करुन एखाद्याला सोडवणं हे वेगळं. सरकार चालवताना वेगवेगळ्या विभागांना गती देणं हे केलं पाहिजे.

Jayant Patil Criticized To CM Eknath Shinde
Salman Rushdie: लेखक सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर; डोळे गमावण्याचा धोका

मी हे म्हणत नाही की, ते करु शकणार नाहीत, पण पूजा अर्चा, होम-हवन यात जरा जास्त वेळ जातोय, मग जनतेसाठी वेळ कधी मिळणार? असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सोलापुरात लगावला आहे. दरम्यान, जयंत पाटील यांनी देव-धर्म, पूजा-अर्चा याबाबत केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी मंडळींकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com