Eknath Shinde News: महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची हयगय करणार नाही; मुख्यमंत्र्यांचा इशारा

'इंडिक टेल्स' या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनोज सौनिक यांना दिले आहेत.
eknath shinde news
eknath shinde news saam tv

Mumbai News: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 'इंडिक टेल्स' या वेबसाईटवरील आक्षेपार्ह लिखाणामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आक्षेपार्ह लिखाणामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे . हा मुद्दा विरोधी पक्षांनी उचलून धरला आहे. या प्रकारणाची दखल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घेतली आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या 'इंडिक टेल्स' या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनोज सौनिक यांना दिले आहेत. (Latest Marathi News)

'इंडिक टेल्स' या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. या गोष्टीबाबत अनेक राजकीय, सामाजिक संस्थांनी सरकारकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

eknath shinde news
Ajit Pawar News: दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून २ विभूतींचा पुतळा का हटवला? अजित पवारांचा शिंदे सरकारला सवाल

महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे. तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थेने घेणे गरजेचे आहे.

महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, असा इशारा देतानाच 'इंडिक टेल्स' वरून लिहिण्यात आलेल्या लेखात काही आक्षेपार्ह बाबी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

eknath shinde news
Ban Indic tales: पुतळे हटवल्याने राष्ट्रवादी आक्रमक; अजित पवारांसह भुजबळ अन् जयंत पाटील उतरले रस्त्यावर

सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाणावरून राष्ट्रवादी आक्रमक

'इंडिक टेल्स' या वेबसाईटवर सावित्रीबाई फुलेंविषयी अक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, अजित पवार आणि जयंत पाटील यांनी केली आहे. छगन भुजबळांनी या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलं आहे.

सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाणाच्या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या वेबसाईटवर काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com